ठळक मुद्देनगरपरिषदेची कारवाई
अकोट: आकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील अतिक्रमण करून उभारलेली धार्मिक स्थळे निष्कासित करण्यास आज 13 नोव्हेबर रोजी प्रशासनाने प्रारंभ केला.शहरातील ४८ धार्मिक स्थळ न्यायालयाचे आदेशाने हटविण्यात येत आहेत. जिल्हा समितीने मंजुर केलेल्या यादीनुसार दुपारपर्यंत १० धार्मिक स्थळ पाडण्यात आली. प्रशासनाने नगरपरिषद मधील स्थळापासुन मोहीमला प्रारंभ केला. या मोहीम मध्ये तहसिलदार विश्वनाथ घुगे, मुख्याधिकारी गिता ठाकरे यांचेसह तीन पथक आहेत. मोहीम दरम्यान अनुचित प्रकार घडु नये याकरीता अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकांत सागर , अकोट शहर पोलीस निरिक्षक गजानन शेळके यांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. शिवाय अनेक लोकांनी स्वतःहुन धार्मिक स्थळ काढत असल्याचे दिसत आहे.