शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठेत ठिकठिकाणी लघु व्यावसायिक, फेरिवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून, अकाेलेकरांना धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. या समस्येवर ताेडगा काढत जिल्हाधिकारी तथा मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी लघु व्यावसायिकांसाठी खुले नाट्यगृहामागील मैदान, भाटे क्लब मैदान व जठारपेठस्थित मनपा शाळा क्रमांक ५ च्या आवारात व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. प्रशासनाच्या निर्देशांकडे अतिक्रमकांनी पाठ फिरवली असून, रस्त्यावरच बाजार थाटला आहे. ही बाब लक्षात घेता निमा अराेरा यांनी २ सप्टेंबरपासून शहरात अतिक्रमण हटाव माेहिमेला प्रारंभ केला आहे. कारवाईमध्ये मनपाचे सहा. अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, बाजार अधीक्षक संजय खराटे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ, गौरव श्रीवास, तसेच अतिक्रमण विभाग, पोलीस विभाग व शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग हाेता.
अतिक्रमकांवर उगारला कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:23 AM