काँग्रेसच्या निरीक्षकांसमाेरच कार्यकर्त्यांची बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 10:05 AM2021-07-17T10:05:02+5:302021-07-17T10:12:38+5:30

Politics News : या प्रकारामुळे काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे.

Activists fight infront of Congress observers in Akola | काँग्रेसच्या निरीक्षकांसमाेरच कार्यकर्त्यांची बाचाबाची

काँग्रेसच्या निरीक्षकांसमाेरच कार्यकर्त्यांची बाचाबाची

googlenewsNext
ठळक मुद्दे काँग्रेसच्या आढावा बैठकीतील घटना नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण शांत

अकोला : स्थानिक स्वराज्य भवन येथे काँग्रेसचे अकाेला प्रभारी भाई नगराळे हे महानगर काँग्रेसच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेत असतानाच या बैठकीत काँग्रेसच्या दाेन कार्यकर्त्यांमध्येच चांगलीच बाचाबाची हाेऊन लाेटपाेटही झाली. या प्रकारामुळे काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे.

काँग्रेसची आढावा बैठक सुरू असताना उत्तर झाेनमधील एका कार्यकर्त्याने तक्रारीचा सूर आळवायला सुरुवात करताच याच झाेनमधील दुसऱ्या कार्यकर्त्याने त्याचे खंडन केले. या दाेघांमध्ये शाब्दिक वाद वाढत जाऊन दाेघांमधील वाद हातघाईवर आला. अखेर नेत्यांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले. या प्रकारामुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापले. ही हाणामारी काँग्रेसमधील वाढत्या गटबाजीमुळेच झाल्याची चर्चा रंगली हाेती. दरम्यान, या प्रकाराबाबत काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चाैधरी यांना विचारले असता त्यांनी या प्रकाराला वैयक्तिक वादाची किनार असल्याचे मत व्यक्त केले.

केंद्राच्या धाेरणाविराेधात रस्त्यावर उतरा : नगराळे

महागाई, इंधन दरवाढ थांबविण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले असून जनतेमध्ये प्रचंड राेष आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या विराेधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा नाकर्तेपणा जनतेपर्यंत पाेहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व अकोल्याचे प्रभारी भाई नगराळे यांनी केले. प्रास्ताविकात महानगर अध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी यांनी शहर काँग्रेसतर्फे आतापर्यंत केलेल्या आंदोलनाची माहिती दिली. या वेळी माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आ. नातिकोद्दीन खातीब, बाबाराव विखे पाटील, विरोधी पक्षनेता साजिद पठाण, रमकांत खेतान, माजी महापौर मदन भरगड, प्रकाश तायडे, राजेश भारती, संजय बोडखे, महेश गणगणे, प्रदीप वखारिया, डॉ. सुधीर ढोणे, चंद्रकांत सावजी, नगरसेवक पराग कांबळे, मो. इरफान, मोंतू भाई, नौशाद भाई, नावेद, जमीर बर्तनवाले, मेहबूब भाई, कपिल रावदेव, डॉ. प्रमोद चोरे, हेमंत देशमुख, निखिलेश दिवेकर, चंद्रशेखर चिंचोलकर, आकाश कवडे, अंशुमन देशमुख, प्रशांत गावंडे, नितीन ताकवाले, डॉ. प्रशांत वानखडे, आकाश शिरसाट, महेंद्र गवई, संजय आठवले, प्रशांत भटकर, नावेद, दिनेश खोब्रागडे, विलास गोतमारे, खान अजहर इकबाल, रमेश समुद्रे, अफरोज लोधी, मो. युसुफ ईश्वर पटेल, विजय शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Activists fight infront of Congress observers in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.