इन्व्हेस्टिगेशन बाइकने ५१५ गुन्ह्यांत तपासणी
जिल्ह्यातील काेणत्याही पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हा घडल्यानंतर त्या घटनास्थळाला भेट देऊन भाैतिक पुरावे शास्त्रीयदृष्ट्या गाेळा करण्यासाठी तसेच आराेपीविरुद्ध दाेषसिद्धी करण्याकरिता इन्व्हेस्टिगेशन बाइक युनिट नव्यानेच निर्माण करण्यात आले आहे. यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आले असून, त्यांनी आतापर्यंत ५१५ गुन्ह्यांच्या घटनास्थळाला भेट देऊन पुरावे गाेळा केले आहेत.
दामिनी पथकाचे पुनर्गठन
महीला, बालक व युवतींच्या सुरक्षेसाठी असलेल्या दामिनी पथकाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन तरुणींची छेडखानी राेखण्यासाठी ७४४७४१००१५ हा माेबाइल क्रमांक देण्यात आले आहे. प्रभावी गस्तीसाठी दाेन शिफ्टमध्ये कामकाज करण्यात येत आहे. यावर तक्रार करण्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे.
फिर्यादी समाधान याेजना राज्यातील पहिला प्रयाेग
जिल्ह्यातील काेणत्याही पाेलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारकर्त्यांना पाेलिसांनी कशा प्रकारे वागणूक दिली तसेच त्यांचे समाधान झाले किंवा नाही यासाठी ही याेजना सुरू करण्यात आली आहे. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर तक्रारकर्त्यांना स्वत: फाेन करून या संदर्भातील माहिती घेत आहेत. राज्यातील हा पहिलाच प्रयाेग आहे.
प्रथमच अडीच काेटींचा मुद्देमाल परत
चाेरीतील जप्त झालेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी अनेकांना पाेलिसांच्या उद्धटपनाचा कटू अनुभव आला आहे. मात्र पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मुद्देमाल परत याेजना राबवून दर महिन्याच्या २९ तारखेला त्या महिन्यात हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात येत आहे. या याेजनेंतर्गत आतापर्यंत दाेन काेटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे.
गस्तीसाठी जीपीएस, क्यूआर काेड सिस्टीम
दिवसाप्रमाणेच रात्रीची गस्त प्रभावी व्हावी यासाठी संवेदनशील अतिसंवेदनशील ठिकाणी तत्काळ प्रतिसाद मिळावा म्हणून वाहनांवर जीपीएस कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे काेणतेही गस्तीचे वाहन १५ मिनिटांपेक्षा अधिक काळ उभे राहिल्यास त्या वाहनचालकावर कारवाई करण्यात येते. तर चाेऱ्या, घरफाेड्या व लुटमार राेखण्यासाठी जिल्ह्यातील २१० ठिकाणी क्यूआर काेड सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्यामुळे रात्र गस्त अधिक परिणामकारक हाेत आहे.
सायबर पेट्रोलिंगमुळे २३ गुन्हेगार उघड
साेशल मीडियावर आक्षेपार्ह पाेस्ट टाकल्यामुळे दंगली घटल्याचे अनेक उदाहरने आहेत. त्यामुळे साेशन मीडियावर अशा प्रकारची पाेस्ट टाकणाऱ्यांवर सायबर पाेलीस ठाण्याकडून सायबर पेट्राेलिंग करण्यात येते. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या प्रयाेगाला सुरुवात केली असून, त्यामुळे वादग्रस्त पाेष्ट टाकणाऱ्या २३ जनांवर कारवाइ करण्यात आलेली आहे.
एक गाव एक पाेलीस याेजना
जनता पाेलीस संबंध सुसंवादातून अधिक वृध्दिंगत करण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एक गाव एक पाेलीस याेजना सुरू केलेली आहे. जिल्ह्यातील ८२१ गावांसाठी ५५२ अंमलदार नेमून ही याेजना सुरू आहे. यासाठी चार विभाग तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून १६१ गावांत सुरक्षारक्षक दल स्थापन करण्यात आले आहे.
सर्व धर्माची शिकवण एक उपक्रम
जामीय सलाेखा कायम राहावा यासाठी सर्व धर्मगुरुंना साेबत घेऊन तालुकास्तर व ग्रामीण भागाता मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले. यासाठी सर्व धर्मगुरुंनी पाेलिसांना सहकार्य केले. २२ पाेलीस ठाण्याच्या हद्दीत पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर याच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
महिलांसाठी बडी काॅप याेजना
महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी कम्युनिटी पाेलिसिंगअंतर्गत बडी काॅप याेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक पाेलीस स्टेशन स्तरावर एका अंमलदाराची बडी काॅप म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विविध ठिकाणी काम करणाऱ्या महिलांचे व्हाॅटस ॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना येणाऱ्या अडचणी साेडविण्यासाठी २४ तास पाेलीस सज्ज आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षा समिती
ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी प्रत्येक पाेलीस स्टेशन स्तरावर ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. यासाेबतच ज्येष्ठांना मदत व्हावी म्हणून सेवाभावी व सामाजिक संघटनांचेही सहकार्य घेण्यात येत आहे. त्यांच्या मदतीसाठी ८८०५४६११०० हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे.