शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सिंचन क्षेत्रासोबतच उत्पादकता वाढवावी लागेल! - जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 7:53 PM

आंतरराष्टÑीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ.माधवराव चितळे अकोल्यात आले असताना ‘लोकमत’शी बातचित करताना त्यांनी पाणी विषयावर सर्वच अनुषंगाने माहिती दिली.

 

- राजरत्न सिरसाट

अकोला : सिंचन क्षेत्रात वाढ होत असून, सिंचन आयोगाच्या अहवालाच्या आकडेवारीवरू न हे समोर आले आहे.आता  प्रतिघनमिटर  पाण्याची उत्पादकता वाढवणे हे खरे काम आहे. तदव्तच पाणी व्यवस्थापन काळाची गरज असल्याने लोकांचा सहभाग व जागरू कता वाढवावी लागणार आहे. सिंचन परिषदेतून हाच संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आंतरराष्टÑीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ. माधवराव चितळे यांनी रविवारी दिली.

दोन दिवसीय २० वी महाराष्ट्र सिंचन परिषद येथे आयोजित करण्यात आली होती,या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी डॉ. चितळे अकोल्यात आले असताना ‘लोकमत’शी बातचित करताना त्यांनी पाणी विषयावर सर्वच अनुषंगाने माहिती दिली. 

 - सिंचनाचा तर अनुशेष आहे ?उत्तर-  सिंचन आयोगाच्या ताज्या अहवालानुसार सिंचनाचे क्षेत्र वाढत असल्याचे समोर आले आहे. विदर्भातही या अनुषंगाने काम होत आहे पंरतु खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पावसाचे पाणी साठविण्याची.ती क्षमता आपण निर्माण न केल्याने पावसाचे पाणी समुद्राकडे वाहून जात आहे.आजमितीस आपण केवळ ३० टक्के पाण्याचा साठा करू  शकलो. 

- पाणी साठविण्यासाठी काय करावे?उत्तर- साठे तयार करावे लागणार आहेत.तदव्तच मुलस्थानी जलसंवर्धनही करावे लागेल.राहणीमान बदलले असून, पाण्याचा वापर वाढला आहे.शेती,उद्योग आदी विकासाला वर्षाकाठी किती पाणी लागते याचा ताळेबंद ठेवावा लागणार आहे. 

- जलप्रदुषणावर उपाययोजना अपुºया पडतात का ?उत्तर- हे प्रशासकीय आव्हान आहे. यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत.त्याचा वापर केला पाहिजे.नद्या,ओढे, तलाव आदी ठिकाणी लोकांनी कचरा,घाण टाकणे टाळले पाहिजे ,नद्याच्या काठचे अतिक्रमण काढून नद्यांचा श्वास मोकळा करणे तेवढेच अत्यावश्यक आहे. त्यासाठी लोकांनी पाण्यावर प्रेम करावे,त्यासाठीची जनजागृती करावी लागणार असून, शहर ते ग्राम पातळीवर विविध समित्या स्थापन कराव्या.या समित्यांचे संचालन जिल्हा परिषद,पंचायत समित्या,ग्राम पंचायतीमार्फत होणे गरजेचे आहे.व्यापक स्वरू पात जनजागृती होईल.

-  खारपाणपट्टयासाठी कोणत्या उपाययोजना राबवाव्यात?उत्तर- विदर्भातील खारपाणपट्ट्यात नवीन स्वच्छ पावसाचे पाणी मुलस्थानी साठवणूक व जिरवावे लागले.

- जलतिनीचा फायदा झाला का? उत्तर- पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनी पहिली जलनिती ठरविण्यासाठी पुढाकार घेतला होता.त्याचा फायदा झाला आहे.आता खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पाणी वाढविण्याची.त्यांनतर दुसरी जलनिती ठरविण्यात आली त्यामध्ये किरकोळ बदल करण्यात आले.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत