कोरोनाला हद्दपार करण्याकरता वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याने पोलीस प्रशासनानेसुद्धा आपली पावले जलद गतीने उचलली असून मुक्तसंचार करणाऱ्या आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्या ग्रामस्थांना मज्जाव करून आणि दुचाकीवर गावांमधून फिरणाऱ्या मोटरसायकल वाहनधारकांवर सुद्धा यावेळी कारवाई करण्यात आली. यावेळी पातूर पोलिसांनी २० मोटरसायकली पोलीस स्टेशन आवारामध्ये कलम १८८ नुसार प्रतिबंधित कारवाई करण्यात आल्याने मुक्त संचार करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी येथील संभाजी महाराज चौक, जुने बसस्थानकावर स्वतः हजेरी लावत, वाहनधारकांवर कारवाई केली. २२ एप्रिलपासून सुरू झालेली कारवाई सुरूच असल्याने संचारबंदी दरम्यान मुक्तसंचार कमी झाला आहे. यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाने दिलेले सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
फोटो: मेल फोटोत