गत ५ डिसेंबर रोजी ग्रा. पं. निवडणूक अडगाव बु. प्रभाग क्र ४ मतदार यादीबाबत आक्षेप पंकज देशमुख यांनी नोंदविला. या आक्षेपानंतर तलाठी यांनी ८ डिसेंबर रोजी सुधारित अहवाल सादर केला. तलाठी यांनी जाणीवपूर्वक स्थळ निरीक्षण न करता एका राजकीय व्यक्तीचे हित जोपासण्याकरिता चुकीचा अहवाल सादर केला. तक्रारदारांने सरकार पोर्टलवर १२ डिसेंबरला तक्रार केल्यावर २३ डिसेंबर रोजी मंडळ अधिकारी सौदागर यांनी स्थळ निरीक्षण करून सुधारित अहवाल सादर केला. या अहवाल ८७ नावे वेगवेगळ्या प्रभागातील मतदार आहेत हे सिद्ध होते. तलाठी इंगळे व मंडळ अधिकारी या दोघांच्या अहवाल तफावत दिसून येत आहे. इंगळे यांनी केलेला अहवाल स्थळ निरीक्षण न करता चुकीचा दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. २८ डिसेंबर रोजी प्राप्त कारणे दाखवा नोटीसला दिलेल्या २९ डिसेंबरचा खुलासा व स्पष्टीकरण अहवालात नजरचुकीने हे असल्याचे नमूद आहे, मात्र आर्थिक देवाण-घेवाण व जाणीवपूर्वकच इंगळे तलाठी यांनी अहवाल सादर केल्याचा आरोप पंकज देशमुख यांनी तक्रारीत केला आहे. अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
अडगाव बु. येथील मतदार यादीत नावांचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:17 AM