शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

अल्पसंख्याक शाळांमधील ५0 अतिरिक्त शिक्षकांचे लवकरच समायोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 2:05 PM

अकोला : जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळांमधील ५0 (उर्दू) अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित करण्यात आल्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविल्या.

ठळक मुद्देजिल्ह्यातील उर्दू विभागाचे ५0 शिक्षक अतिरिक्त ठरले असून, केवळ तीन जागा रिक्त आहेत.समायोजन करताना कोणत्याही अतिरिक्त शिक्षकावर अन्याय होऊ देणार नसल्याचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी स्पष्ट केले आहे. रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये केवळ तीनच शिक्षकांचे समायोजन होणार आहे.

अकोला : जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळांमधील ५0 (उर्दू) अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित करण्यात आल्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविल्या. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद हे शिक्षकांनी नोंदविलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांच्या अडचणी ऐकून घेतली. त्यामुळे लवकरच केलेल्या नियोजनानुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.शिक्षणाधिकाºयांकडे अतिरिक्त शिक्षकांनी दाखल केलेल्या हरकतींवर येत्या काही दिवसांत संबंधित शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर सुनावणी सुरू होईल. सुनावणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची संपूर्ण माहिती त्यांच्या लॉगिनवर गोळा होईल. जिल्ह्यातील उर्दू विभागाचे ५0 शिक्षक अतिरिक्त ठरले असून, केवळ तीन जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर समायोजन करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने नियोजन करीत आहे. येत्या काही दिवसांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी निश्चित होईल. त्यानंतर समायोजनाची तारीख निश्चित करण्यात येईल. समायोजन करताना कोणत्याही अतिरिक्त शिक्षकावर अन्याय होऊ देणार नसल्याचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी स्पष्ट केले आहे. रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये केवळ तीनच शिक्षकांचे समायोजन होणार आहे. परंतु, उर्वरित ४७ शिक्षकांचे समायोजन होईल की नाही, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. परंतु, शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिकेच्या शाळांमध्ये समायोजन करता येऊ शकते. त्यामुळे या शाळांमधील शिक्षणाधिकारी १00 टक्के समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करतात का? की अतिरिक्त शिक्षकांना विभाग स्तरावर पाठवतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र