शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अतिरिक्त ४२ शिक्षकांचे जिल्ह्यामध्ये समायोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 2:07 AM

अकोला: जिल्हय़ातील ५२ माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ७१ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे जिल्हय़ातील विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आले, तर २४ शिक्षकांचे अमरावती विभाग शिक्षण उपसंचालक स्तरावर समायोजन होणार असल्याने, या अतिरिक्त शिक्षकांनी पुढील आदेशापर्यंत त्यांच्या मूळ शाळेवरच अध्यापनाचे कार्य करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी गुरुवारी दिले. 

ठळक मुद्देअतिरिक्त शिक्षकांना रुजू होण्याचा आदेश २४ शिक्षकांचे विभाग स्तरावर समायोजन होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हय़ातील ५२ माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ७१ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे जिल्हय़ातील विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आले, तर २४ शिक्षकांचे अमरावती विभाग शिक्षण उपसंचालक स्तरावर समायोजन होणार असल्याने, या अतिरिक्त शिक्षकांनी पुढील आदेशापर्यंत त्यांच्या मूळ शाळेवरच अध्यापनाचे कार्य करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी गुरुवारी दिले. २0१६-१७ च्या संचमान्यतेनुसार शाळांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अतिरिक्त शिक्षक व रिक्त पदांची यादी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने १९ सप्टेंबर रोजी प्रकाशित केली होती. या यादीनुसार अतिरिक्त शिक्षकांनी त्यांना अतिरिक्त ठरविल्यामुळे शिक्षणाधिकार्‍यांकडे हरकती दाखल केल्या होत्या. त्यानुसार शिक्षणाधिकारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि अतिरिक्त शिक्षकांसमोर सुनावणी घेऊन निर्णय दिला. त्यानंतर समायोजनासाठी प्राप्त झालेली ऑनलाइन अंतिम यादी शिक्षणाधिकारी कार्यालयाने २८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली आणि २८ सप्टेंबर रोजी भारत स्काउट- गाईड सभागृहामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, उप-शिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार यांच्या मार्गदर्शनात राऊंड पद्धतीने समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी अतिरिक्त शिक्षकांसह रिक्त पद असलेल्या शाळांचे मुख्याध्यापक हजेरीपत्रक, कार्यरत शिक्षकांच्या यादीसह हजर होते. अतिरिक्त शिक्षकांसमोर प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्क्रीनवर रिक्त पदांची नावे समोर ठेवण्यात आली. सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांचे एकूण सहा राऊंड घेण्यात आले. या राऊंडदरम्यान स्क्रीनवर अतिरिक्त शिक्षकांना शाळांची नावे दाखवून त्यांना शाळेची निवड करण्यास सांगण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त शिक्षकांनी आपल्याला सोयीचे ठिकाण ठरेल, अशी शाळा निवडली.  रिक्त पद असलेली शाळा निवडल्यानंतर, शिक्षणाधिकार्‍यांनी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांसमोरच त्यांना नियुक्तीपत्र दिले. जिल्हय़ातील ५२ शाळांमधील ७१ अतिरिक्त शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांनी रिक्त पदे असलेल्या शाळा निवडल्या. २४ अतिरिक्त शिक्षकांना इतर रिक्त पदांवर विषय आणि आरक्षण नसल्यामुळे त्यांचे समायोजन विभाग स्तरावर करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी स्पष्ट केले. 

या शिक्षकांचे झाले समायोजनसीमा मुळे, शालिनी देशमुख, उषा चिमणकर, भगवान वाघ, राजेश्‍वरी देशमुख, जयश्री जंजाळ, विद्या नागे, शेषराव तायडे, मनोज दीक्षित, मधुकर नेहरे, गोपाल गोतमारे, विद्या ठाकरे, अविनाश मोहोकार, श्रीधर मोकाशी, संजय गोपनारायण, सुधाकर कुरई, शुभांगी ठोसर, वसंत वेरूळकर, विनिता मसाळकर, सुरेश काळपांडे, मधुकर दावेदार, राजश्री नागे, कैलास बगे, शरद धनी, दीपाली ताथोड, नीलेश साबळे, रमाकांत भारकर, योगेश कांबळे, करूणा उजवणे, प्रणिता पुसदेकर, राजू पारधी, दत्तात्रय बुधे, योगेश राऊत, ज्ञानेश्‍वर दांदळे, सुमित मेटांगे, जितेंद्र थोरात, रागिणी वाडवे, शुभांगी सपकाळ, चेतन ताथोड, अर्चना चर्‍हाटे, अनुराग भोपळे, अमोल जाधव आदींचे जिल्हय़ात विविध शाळांवर समायोजन करण्यात आले. 

या शिक्षकांना विभाग स्तरावरील समायोजनाची प्रतीक्षासंजय शर्मा, शैला मालोकार, प्रदीप गावंडे, गजानन मोहोकार, अनिल काळे, हर्षलता सायरे, केशव चव्हाण, सुभाष काकड, श्रीकृष्ण वानखडे, पंजाबराव साबीले, राहुल भगत, संदीप पळसपगार, प्रमोद आखरे, संगीता नवलकार, दीपा निंबाळकर, प्रतिभा अवताडे, बिपीन नावकार, सतीश राऊत, मोहन करस्कार, प्रकाश घाटोळे, सतीश गोकने, विजय देऊळकर, मदन रेळे, धीरज भिसे आदी शिक्षकांचे विभाग स्तरावर समायोजन होणार आहे. त्यांनी मूळ शाळेवरच काम करावे, असे निर्देश शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहेत.

कही खुशी कही गम..गुरुवारी झालेल्या समायोजनामध्ये अनेक शिक्षकांचे बाहेरगावच्या शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन झाले. यामध्ये शहरातील अनेक शिक्षक असल्यामुळे त्यांच्यासमोर दोन ते तीन शाळांमधून एक निवडण्याशिवाय गत्यंतरच नव्हते.  अनेक शिक्षक अकोला शहर किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहतात. अशा शिक्षकांना शहरातील, तालुक्यातील शाळा मिळाल्यामुळे त्यांनी सभागृहातच टाळय़ा वाजवून आनंद व्यक्त केला; परंतु ज्यांना दूर अंतरावरील शाळा मिळाल्या, ते शिक्षक नाराज झाल्याचे दिसून आले.