लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हय़ातील अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांचे दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती, रिक्त पदे, आरक्षण व विषयाची माहिती मागविली आहे. जवळपास माहिती संकलनाचे काम पूर्णत्वास आले असून, दिवाळीच्या सुट्या सं पल्यानंतर समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येईल. जिल्हय़ातील मराठी शाळांमधील ७१ पैकी ४२ शिक्षकांचे जिल्हय़ातील विविध शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन केल्यानंतर आता जिल्हय़ातील अल्पसंख्यक शाळांमधील अ ितरिक्त ठरणार्या शिक्षकांचा क्रमांक लागणार आहे. अल्पसं ख्याक शाळांमधील अंदाजे ८0 शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांमध्येही अतिरिक्त ठरण्याची धास्ती निर्माण झाली असून, अतिरिक्त ठरल्यानंतर आपले समायोजन होईल की नाही आणि बाहेरगावी झालेच तर काय करावे, अशी चिंता शिक्षकांना सतावू लागली आहे. अतिरिक्तच्या यादीमध्ये आपले नाव येऊ नये, यासाठी अनेक शिक्षक देवाला साकडे घालत आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांची जिल्हय़ातील अल्पसंख्याक शाळांना शिक्षकांची पदसंख्या, आरक्षण, रिक्त पदे याची माहिती मागविली आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांतच अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची यादी प्रकाशित करण्यात येईल आणि दोन दिवस शिक्षकांना हरकती नोंदविण्यासाठी वेळ देण्यात येईल. त्यानंतर सुनावणी घेऊन लगेच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येईल.
शाळा न निवडल्यास सेवासमाप्तीअतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाइन समायोजन करताना, आरक्षण आणि विषयाचा विचार करण्यात येत आहे. अतिरिक्त शिक्षकांना पाच ते सहा राऊंडपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. त्यातही ऑनलाइन शाळा निवडताना, कोणाला दोन ते कोणाला एकच शाळा पर्याय म्हणून मिळते. त्यामुळे विचार करायलाही वेळ मिळत नाही. शिक्षकाला शाळा पसंत नसल्यावरही त्याला शाळा निवडणे भागच आहे. कारण शाळा निवडली नाही, तर शिक्षण विभागाला मूळ आस्थापना असलेल्या शाळेला पत्र देऊन संबंधित शिक्षकांची सेवासमाप्ती करण्याचे अधिकार आहेत.
संचमान्यता दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. शाळांकडून अ ितरिक्त शिक्षकांची माहिती मागविण्यात आली असून, दिवाळीची सुटी संपल्यानंतर शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू होईल. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी