अकोला - आर्शल डिलिबल मिडलॅन्ड (एडीएम) अँग्रो इंडस्ट्रिज कोटा अँण्ड अकोला प्रायव्हेट लिमिटेड, या मल्टी नॅशनल कंपनीचे तीन युनिट एकाचवेळी बंद करण्यात आले आहेत. अकोला, नागपूर व राजस्थानमधील कोटा येथील युनिटला एकाच दिवशी टाळे लावण्यात आले असून, त्यामुळे ४५0 ते ५00 कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामधून काही तोडगा काढण्यात यावा, या मागणीसाठी कामगारांनी हालचाली सुरू केल्या असून, त्या संदर्भात उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना निवेदनही देण्यात आले आहे. एडीएम अँग्रो इंडस्ट्रिज कोटा अँण्ड अकोला प्रायव्हेट लिमिटेड या मल्टी नॅशनल कंपनीचे महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थान येथे पाच युनिट असून, या ठिकाणी परंपरा सोयाबीन तेल निर्मिती करण्यात येते. मात्र यामधील अकोला, नागपूर व राजस्थान येथील कोटा हे तीन युनिट बंद करण्यात आले असून, प्रचंड आर्थिक मंदीचे कारण देत कामगारांना काम बंद करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल २00 कामगार घरी बसले असून, त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह बंद झाला आहे. अकोला युनिटमधील कार्यालयीन कर्मचारी व कामगार अशाप्रकारे २00 जणांचे काम एकाचवेळी बंद करण्यात आल्याने या कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांनी यामध्ये तोडगा काढण्याची मागणी केली आहे. या मल्टी नॅशनल कंपनीचे लातूर व धारवाड हे दोन युनिट सुरूच असून, या बरोबरच अकोला युनिट तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. पूर्वीची ह्यसिद्धार्थ सोयाह्ण नामक असलेली ही कंपनी नंतर एडीएम अँग्रो इंडस्ट्रिज या नावाने सुरू करण्यात आली होती. या कंपनीचे संचालक विदेशातील असून, आर्थिक मंदी असल्याने सोमवारी दुपारी कामगारांची एक बैठक घेऊन ही कंपनी बंद करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
‘एडीएम’ अँग्रो इंडस्ट्रिजच्या तीन युनिटला टाळे
By admin | Published: August 13, 2015 1:22 AM