लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘लॉकडाउन’मध्ये जिल्ह्यात अडकलेल्या विविध १६ राज्यांमधील २ हजार ९३३ आश्रित मजुरांना त्यांच्या गावाकडे लवकरात पाठविण्यात येणार आहे. परराज्यातील या मजुरांना रेल्वे व बसद्वारे त्यांच्या गावाकडे रवाना करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’ विविध राज्यांतील मजूर जिल्ह्यात अडकले आहेत. परराज्यातील आश्रित मजुरांना त्यांच्या गावाकडे पाठविण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या राज्यांतील १ हजार ४७३ मजुरांना त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यात आश्रित असलेल्या विविध १६ राज्यांमधील २ हजार ९३३ मजुरांना लवकरच त्यांच्या गावाकडे पाठविण्यात येणार आहे. रेल्वेगाडी व बसेसद्वारे या परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावाकडे रवाना करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.जिल्ह्यात असे आहेत परराज्यातील आश्रित मजूर!जिल्ह्यात विविध १६ राज्यांतील २ हजार ९३३ मजूर आश्रित आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश-९२, आसाम-७५, बिहार- ६१९, छत्तीसगड-२३, गुजरात-७, झारखंड-३२७, कर्नाटक-६, केरळ- ९, मध्य प्रदेश-४१३, ओडिशा-३९, पंजाब-६, राजस्थान-४१०, तामिळनाडू-४, तेलंगणा-१३७, उत्तर प्रदेश-२७६, उत्तराखंड-१६, पश्चिम बंगाल-४७४ इत्यादी मजुरांचा समावेश आहे.
विविध १६ राज्यांतील जिल्ह्यात आश्रित असलेल्या २ हजार ९३३ मजुरांना रेल्वे व बसेसद्वारे त्यांच्या गावाकडे पाठविण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.- संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.