शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

पातूर तालुक्यातील ३३ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:38 PM

पातूर तालुक्यातील विविध गावांमध्ये ३३ काँक्रीट रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अकोला : लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सन २०१९-२० वर्षासाठी जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील ३३ रस्ते कामांना शासनामार्फत ८ आॅगस्ट रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात येत आली असून, मंजूर रस्ते कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसंदर्भात शासनाच्या ग्रामविकास व पंचायत विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्यामध्ये सन २०१९-२० या वर्षासाठी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विविध गावांमध्ये ३३ काँक्रीट रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मंजूर रस्ते कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली असून, मंजूर निधी शासनामार्फत लवकरच जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहे. मंजूर कामांवर निविदा प्रक्रिया सुरू करून, ज्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याच कामांवर खर्च करणे बंधनकारक राहणार आहे, तसेच मंजूर केलेल्या कामांसाठी जिल्हा परिषदेच्या प्रचलीत कार्यपद्धतीनुसार प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा काढणे व स्वीकारणे इत्यादी प्रकारची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्याकडून करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची राहणार असल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला