अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूर व बार्शीटाकळी या दोन तालुक्यांतील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ४८ लाख ११ हजार रुपयांच्या नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २० फेबु्रवारी रोजी दिला.जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या प्रस्तावानुसार मूर्तिजापूर तालुक्यातील दोन गावांमध्ये आणि बार्शीटाकळी तालुक्यातील चार गावांमध्ये अशा एकूण सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी सहा नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांकरिता ४८ लाख ११ हजार रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला. प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली पाणीटंचाई निवारणाची कामे १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करून, त्याद्वारे पाणी पुरवठा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांच्या आदेशात देण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील सहा गावांतील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.गावनिहाय मंजूर अशी आहेतनळ योजना दुरुस्तीची कामे!बार्शीटाकळी तालुका : बोरमळी, घोटा, शेलगाव व खेर्डा बु.मूर्तिजापूर तालुका : उमरी व राजुरा सरोदे.