अकोला : उगवा येथील पाणीटंचाई निवारणासाठी तात्पुरती पूरक नळ योजनेच्या कामासाठी २० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी २१ जानेवारी रोजी दिला.अकोला तालुक्यातील उगवा येथे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. या पृष्ठभूमीवर उगवा येथील पाणीटंचाई निवारणासाठी तात्पुरती पूरक नळ योजनेच्या कामाकरिता २० लाख रुपयांपर्यंत खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी २१ जानेवारी रोजी दिला. प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या तात्पुरत्या पूरक नळ योजनेचे काम पूर्ण करून त्याद्वारे गावात पाणी पुरवठा सुरू करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषदेला आदेशात दिले आहेत.