लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील अकोला, अकोट व तेल्हारा या तीन तालुक्यांतील २५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिला. ५३ लाख ११ हजार ५६४ रुपयांच्या कामांमध्ये २० कूपनलिका व ८ विंधन विहिरींच्या कामांचा समावेश आहे.जिल्ह्यातील अकोला, अकोट व तेल्हारा इत्यादी तीन तालुक्यांतील २५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.त्यानुसार संबंधित तीन तालुक्यांतील २५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५३ लाख ११ हजार ५६४ रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. त्यामध्ये २० कूपनलिका व ८ विंधन विहिरी अशा एकूण २८ कामांचा समावेश आहे.
कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश!प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या २५ गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे येत्या ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले.कामांसाठी मान्यता दिलेली अशी आहेत गावे! अकोला तालुका: अमानतपूर, उगवा, दहीगाव गावंडे, कानडी, सुकोडा व कौलखेड जहागीर. अकोट तालुका: पिंप्री खुर्द, दनोरी, रुईखेड, वडाळी देशमुख. तेल्हारा तालुका: भांबेरी, खेलसटवाजी, खंडाळा, कार्ला बु., इसापूर, हिंगणी बु., गोर्धा, घोडेगाव, गाडेगाव, तळेगाव बु., मनात्री बु., बेलखेड, माळेगाव व शेरी बु.