अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात समाविष्ट ४२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५३ लाख ३८ हजार ८९१ रुपयांच्या ३१ विंधन विहिरी व १६ कूपनलिकांच्या कामांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिली.जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हाधिकाºयांनी मंजूर केला आहे. कृती आराखड्यात समाविष्ट अकोला तालुक्यातील १०, बार्शीटाकळी तालुक्यातील ४, बाळापूर तालुक्यातील १४, तेल्हारा तालुक्यातील २ आणि अकोट तालुक्यातील १२ अशा एकूण ४२ गावांमध्ये पाणी टंचाई निवारणाची कामे करण्यासाठी ३१ विंधन विहिरी व १६ कूपनलिकांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने ४२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५३ लाख ३८ हजार ८९१ रुपये खर्चाच्या विंधन विहिरी व कूपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांनी ६ फेबु्रवारी रोजी दिला. प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याने, संबंधित गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश!४२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचा आदेशही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा परिषदसह संबंधित यंत्रणांना दिला आहे.
अकोला जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 2:50 PM
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात समाविष्ट ४२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५३ लाख ३८ हजार ८९१ रुपयांच्या ३१ विंधन विहिरी व १६ कूपनलिकांच्या कामांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिली.
ठळक मुद्देजिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हाधिकाºयांनी मंजूर केला आहे. ५३ लाख ३८ हजार ८९१ रुपयांच्या ३१ विंधन विहिरी व १६ कूपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली.प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याने, संबंधित गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.