लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)सौरभ कटीयार यांनी २१ आॅगस्ट रोजी दिला. त्यानुसार प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना मूळ पदाचे कामकाज सांभाळून ग्रामपंचायत प्रशासकपदाचा कारभार सांभाळावा लागणार आहे.जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या पाच वर्षांच्या कालावधीची मुदत २७ ते ३१ आॅगस्टदरम्यान संपत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुका सद्यस्थितीत घेणे शक्य नसल्याने, शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना २१ आॅगस्ट रोजी दिला. जिल्ह्यातील पंचायत समित्यांतर्गत पंचायत, कृषी, शिक्षण, सांख्यिकी विभागाचे विस्तार अधिकारी, पशुधन विकास अधिकारी व जिल्हा परिषद शाळांचे केंद्रप्रमुख इत्यादी संवर्गातील अधिकाºयांची ग्रामपंचायत प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकाºयांना त्यांच्या मूळ पदाचे कामकाज सांभाळून ग्रामपंचायत प्रशासकपदाचे कामकाज करावे लागणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींचे प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या संबंधित अधिकाºयांना मूळ पदाचे कामकाज करून ग्रामपंचायत प्रशासकपदाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
ग्रामपंचायतींमध्ये होणार राजकारणविरहीत कारभार!राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांव्यतिरिक्त ग्रामपंचायत प्रशासक म्हणून अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली असल्याने, जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींमध्ये गावपातळीवरील राजकारणविरहीत कारभार २७ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये प्रशासकपदाच्या कालावधीत गावविकासाची कोणकोणती कामे मार्गी लागणार, याबाबत संबंधित गावांमधील ग्रामस्थांमध्ये उत्सुकता लागली आहे.