शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

२५ टक्के प्रवेश प्रक्रिया नव्याने राबवा; अन्यथा आंदोलन - युवासेनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:37 PM

अकोला: आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत अनेक दोष असल्यामुळे आर्थिक सक्षम असलेल्या पालकांनीच या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटिल यांनी जिल्हाधिकारी यांनी निवेदन देऊन ही यादी रद्द करून पुन्हा हि प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन अर्ज सादर करताना द्यावयाची माहिती व कागदपत्रे तपासण्याची शासनाकडे कोणतीही यंत्रणा नाही. आॅनलाईन अर्ज सादर करताना शाळेचा आसपास जिथे वस्तीही नाही तिथे घराचा पाईंट दाखविण्यात आला आहे. मुळात हि प्रक्रियाच चुकीची असल्यामुळे खरे लाभार्थी यापासुन वचिंत राहत आहेत.

अकोला: चांगल्या दर्जाच्या शिक्षणापासुन गरीब विद्यार्थी वचिंत राहु नये म्हणुन शासनातर्फे प्रत्येक खाजगी शाळांना २५ टक्के प्रवेश बंधनकारक करण्यात आले आहेत.मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी राबविण्यात येणारी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत अनेक दोष असल्यामुळे आर्थिक सक्षम असलेल्या पालकांनीच या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटिल यांनी जिल्हाधिकारी यांनी निवेदन देऊन ही यादी रद्द करून पुन्हा हि प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली आहे. गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही तर युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान या मागणीचे एक लेखी निवेदन शिक्षण मंत्री ना.विनोद तावडे, पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.या आॅनलाईन पध्दतीमुळे सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याच मुलांचे नंबर कसे काय लागले यााबाबत त प्राप्त माहिती नुसार हि प्रक्रियाच मुळात चुकीची आहे.आॅनलाईन अर्ज सादर करताना द्यावयाची माहिती व कागदपत्रे तपासण्याची शासनाकडे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे अर्जदार पालकांनी दिलेली माहिती गृहीत धरून त्यांच्या मुलाला या योजनेत पात्र ठरविण्यात येते हे कितपत योग्य आहे. आॅनलाईन अर्ज सादर करताना शाळेचा आसपास जिथे वस्तीही नाही तिथे घराचा पाईंट दाखविण्यात आला आहे. ही माहिती चुकीची असुनही संगणकाने खरी मानुन त्या पालकांची निवड केली आहे. त्यामुळे त्या भागात राहणाऱ्या खºया पालकांवर फार मोठा अन्याय झाला आहे. काही काही पालकांनी चार ते पाच शाळांमध्ये अर्ज भरलेत व चुकीची माहिती भरली. मुळात हि प्रक्रियाच चुकीची असल्यामुळे खरे लाभार्थी यापासुन वचिंत राहत आहेत. यादी मध्ये खरे लाभार्थी फारच अल्प आहेत. त्यामुळे खरे लाभर्थ्यांना न्याय मिळाण्यासाठी तातडीने नव्याने प्रक्रियां राबऊन खºया लाभर्थ्यांनाा न्याय द्यावा; अन्यथा गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देणायावाठी अकोला जिल्हा युवासेनेला लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदन सादर करतेवेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटिल, उपजिल्हाप्रमुख दिपक बोचरे, शहरप्रमुख नितीन मिश्रा, जिल्हा समन्वयक कुणाल पिंजरकर, अभिजीत मुळे, सागर चव्हाण, महेश मोरे, अस्तिक चव्हाण, रणजीत गावंडे, गिरीश कारसकर, सौरभ नागोशे, धमेंद्र राकेश, प्रतिक देशमुख, आनंद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv SenaशिवसेनाEducation Sectorशिक्षण क्षेत्र