मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेने आंदाेलन करीत माेर्चा काढला. खुले नाट्यगृहासमाेरील भाजप कार्यालयाजवळ पाेलिसांनी अडविला माेर्चा, दरम्यान शिवसैनिकांनी आक्रमक घाेषणा देत राणेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
शिवसैनिकांनी जयहिंद चाैक, गांधी राेडवरवरून भाजप कार्यालयाकडे काढण्यात आला. शिवसैनिकांनी ना. राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राणेंचे वक्तव्य हे महाराष्ट्राचा अवमान करणारे असल्याचे सांगत त्यांच्यावर कठाेर कारवाईची मागणी केली. आंदाेलनात शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, आमदार गाेपिकिशन बाजाेरिया, पश्चिमचे शहर प्रमुख नगरसेवक राजेश मिश्रा, पूर्वचे शहर प्रमुख अतुल पवनीकर, महिला आघाडीच्या ज्याेत्स्ना चाेरे, जि.प. सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ, गाेपाल भटकर, तरुण बगेरे, याेगेश अग्रवाल, मंजूषा शेळके, गजानन चव्हाण, शशिकांत चाेपडे, युवा सेनेचे राहुल कराळे, याेगेश बुंदेले, नितीन मिमश्रा, शरद तुरकर, सागर भारुका, अश्विन नवले आदी सहभागी झाले हाेते.
राणेंच्या पुतळा जप्तीसाठी पाेलिसांसाेबत झटापट
शिवसैनिकांनी राणे यांचा पुतळा तयार करून त्यांच्या हातात काेंबडी असल्याची प्रतिमा माेर्चात आणली तसेच एका युवकाने गाढवावर ना. राणे यांची प्रतिमा लावून ते गाढव माेर्चात आणले, हा माेर्चा भाजप कार्यालयाजवळ आला असतानाच पाेलिसांनी अडविला अन् पुतळा जप्त करण्यासाठी पाेलीस सरसावले. यावेेळी शिवसैनिक पाेलिसांमध्ये पुतळ्यासाठी काही काळ झटापट झाली. अखेर पाेलिसांनी पुतळा जप्त केला.