अकोला : कॅन्सर हा आजच्या काळातील सर्वाधिक जीवीतहानी करणारा रोग असून, या देशात कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. ‘कॅन्सरला कॅन्सल’ करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे लढा उभारला पाहिजे असे सांगत, अकोल्यानंतर आता गोंदीया व सोलापूरमध्येही रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटल उभारणा असल्याची घोषणा रिलायन्स हॉस्पिटलच्या चेअरपर्सन टीना अंबानी यांनी सोमवारी येथे केली.अकोल्यापासून नजीकच असलेल्या रिधोरा येथे रिलायन्स समुहातर्फे उभारण्यात आलेल्या रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटलचे उद्घाटन सोमवार, ३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी टीना अंबानी बोलत होत्या. उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह राज्याचे वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना टीना अंबानी म्हणाल्या की, कॅन्सरच्या सुश्रृषेच्याबाबतीत शहरी व ग्रामीण भागातील तफावत दूर करण्यासाठी रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटल उभारण्यावर भर देत असल्याचे टीना अंबानी म्हणाल्या.
अकोल्यानंतर गोंदीया, सोलापूरातही रिलायन्सचे कॅन्सर केअर हॉस्पिटल - टीना अंबानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:27 PM