अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश गेल्या चार वर्षांपासून ऑनलाइन केंद्रीय प्रवेश पद्धतीने सुरू होते. मात्र, काही शिक्षक संघटनांच्या मागणीवरून माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ही पद्धत बंद करण्याचा घाट घातला होता. याला जोरदार विरोध करत शिक्षणाधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता.
अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश हे केंद्रीय प्रवेश पद्धतीनेच घेण्यात यावेत, अशी मागणीसुद्धा केली होती. याची दखल घेत गुरुवारी माध्य. शिक्षण विभागाने सदर प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश पद्धतीनेच होणार असल्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थी हिताच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
-पवन गवई,
सम्यक विद्यार्थी आंदोलन, अकोला
११ वी विज्ञान शाखेचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने घेण्याचा माध्यमिक शिक्षण विभागाला रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदद्वारा इशारा देण्यात आला; परंतु सदर प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीनेच होणार असल्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेण्यात आला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
-आकाश हिवराळे,
जिल्हा संघटक रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, अकोला
एनएसयूआय गेल्या सहा वर्षांपासून अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश हे केंद्रीय प्रवेश पद्धतीने घेतले पाहिजेत यासाठी लढा देत आहे. अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश हे केंद्रीय प्रवेश पद्धतीनेच घेण्यात यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एनएसयूआयने दिला होता.
-आकाश कवडे, प्रदेश महासचिव एनएसयूआय
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराला आळा बसला आहे. या पद्धतीमुळे प्रवेशात पारदर्शकता राहते. विद्यार्थी संघटनांच्या एकजुटीमुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला विद्यार्थी हिताच्या निर्णयाचे अभाविप स्वागत करते.
-ऋषिकेश देवर, प्रदेश सहमंत्री अभाविप