अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशारे खत्री हत्याकांडातील महत्त्वाचा आरोपी पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंत सिंह चौहान हा मंगळवारी जुने शहर पोलिसांना शरण आला. किशोर खत्री हत्याकांडानंतर तब्बल एक महिन्यापासून फरार असलेल्या जस्सीची नाके बंदी केल्यानंतर त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. खोलेश्वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर रोजी बंदुकीच्या गोळय़ा झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांचे बंधू दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, अंकुश चंदेल व राजू मेहेर यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली; मात्र या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी असलेला पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंत सिंह चौहान हा फरार होता. अखेर मंगळवारी तो जुने शहर पोलिसांसमोर शरण आला. या संदर्भात जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जस्सीच्या शरणागतीला दुजोरा दिला नाही; मात्र तो पोलिसांसमोर शरण आला असून, त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
अखेर पोलीस कर्मचारी ‘जस्सी’ पोलिसांना शरण
By admin | Published: December 09, 2015 2:52 AM