अकोला: राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने मागच्या वर्षी कपाशीचे प्रचंड नुकसान झाले असून, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला होता. यावर्षी सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तथापि, बोंडअळी पूर्णत: नष्ट झाली नसून, प्रादुर्भाव कायम असल्याने शेतकºयांनी फरदडीचा कापूस घेऊ नये, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभागाने दिला आहे.यावर्षी पाऊस कमी झाल्याने कापूस पीक उत्पादनावर परिणाम झाला आहे. सोबतच विविध किडींनीदेखील आक्रमण केले असून, बोंडअळ्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तथापि, या अळीने कपाशीवर बस्तान मांडले आहे. मागील वर्षी कापसावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले होते. त्यामुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाले. यावर्षीदेखील जिनिंगमध्ये येणाºया कापसामध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत येत असल्याचे दिसून आले आहे. ही अळी कापसाच्या बोंडातील कोवळा कापूस व बियाणे फस्त करीत असल्यामुळे कापसाची प्रत खराब होेते. ही गुलाबी बोंडअळी कचºयामध्ये पाच ते सहा महिने राहण्याची क्षमता आहे. हीच अळी पुन्हा पुढच्या वर्षीच्या पिकावर हल्ला करते. म्हणूनच या अळीचे नियंत्रण आताच करण्यासाठीची पाऊले उचलण्यात येत आहेत. शेतातून आणलेल्या कापसात ही अळी जिनिंगमध्ये येत असून, तिला पोषक वातावरण मिळताच या अळीचे पतंग बाहेर येतात. फरदडचा कापूस घेतल्यास ही अळी त्यावर पोषण करू शकते. म्हणूनच फरदडचा कापूस घेण्याचे टाळावे, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात येत आहे.
हिवाळ्यातच नांगरटी करा!कपाशी, सोयाबीनचे पीक काढले असेल आणि त्या ठिकाणी काही पेरणी केलेली नसेल तर शेतकºयांनी शेत नांगरू न घ्यावे, कारण पुढच्या वर्षी सोयाबीन या पिकावरदेखील कीड येण्याचा धोका आहे. फरदडचा कापूस फारच तर डिंसेबर महिन्याच्या शेवटापर्यंत काढून टाकवा व शेत नांगरटी करू न घ्यावी, अन्यथा पुढच्या वर्षी पुन्हा अशा शेतातील कापसावर बोंडअळीचा प्रकोप वाढून इतरही शेतावर प्रसार होईल, असा धोका शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.
बोंडअळीचे जोपर्यंत उच्चाटन होत नाही तो फरदडचे पीक घेऊ नये. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनीदेखील ही काळजी घेणे गरजेचे आहे. डिसेंबरच्या शेवटी शेत नांगरू न घ्यावे.डॉ. मोहनराव खाकरे,ज्येष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.