--बाॅक्स--
कोरोना रुग्णाने केले अंत्यसंस्कार
कोरोना मृत्यूनंतर नातेवाइकही पुढे येत नसताना एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने त्याच्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले. यावेळी पीपीई किट घालून सर्व नियम पाळत सोपस्कार पार पाडले.
--बॉक्स--
५ माणसांना परवानगी; मृतांच्या नशिबी तेही नाही!
कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यास पीपीई किट घालून पाच जणांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. किती जणांना आपल्या रक्ताचे पाच माणसेदेखील मिळाले नाहीत. शेवटी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावे लागल्याचे विदारक चित्र आहे.
--पाॅईंटर्स--
गेल्या वर्षभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू
पालिकेच्या मार्गदर्शनात झालेले अंत्यविधी २५-२६
--कोट--
कोरोना मृतकांवर अंत्यसंस्कारासाठी जवळपास २० टक्केच्या जवळपास मृतकांचे नातेवाइक आले नाहीत. यामध्ये कोणाचे नातेवाईक दवाखान्यात होते, तर कोणाचा मुलगाच यायला तयार नसल्याने नातेवाईकही आले नाही. काही प्रकरणात नातेवाईक स्मशानभूमीत आल्यावरही दूरच राहिले. त्यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.
- दीपक शिंदे, कर्मचारी, मोहता मिल स्मशानभूमी
--कोट--
जवळपास २५-२६ कोरोना मृतकांवर अंत्यसंस्कारावेळी कोणी नातेवाईक आले नाही. यामध्ये अनेकांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त होते, तर काहीजण परराज्यातील असल्याने येऊ शकले नाही. सर्व मृतकांवर रितीरिवाजाने अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. आता बहुतांश मृतकांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी सोबत येत आहेत.
- जावेद झकेरिया, अध्यक्ष, कच्छी मेमन जमात