संताेषकुमार गवई
पातूर अकोला मेडशी दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी दुतर्फा लिंबाचे वृक्ष तोडले जात आहे मात्र तोडलेले वृक्षांचे ओंडके दोन्ही बाजूला तसेच पडून असल्यामुळे या मार्गावर अपघातांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
अकोला मेडशी दरम्यानचे रस्ता चौपदरीकरणाचे कंत्राट गुजरातच्या माेंटे कार्लाे कंपनीने घेतले आहे. सदर कंपनीने रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी महामार्गाच्या दुतर्फा इंग्रज काळातील लावण्यात आलेली लिंबाचे वृक्ष तोडण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. तोडलेल्या वृक्षांचा मलबा रस्त्याच्या दुतर्फा पडून असल्यामुळे अपघातांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक अपघात झाले असून काहींना जखमी तर काहींवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. याकडे वृक्ष तोडणाऱ्या कंपनीचे कमालीचे दुर्लक्ष हाेत असल्याचे स्पष्ट हाेत आहे सदर कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय वाशिम यांची लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे. मात्र सदर कंपनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारत सरकार कार्यालय वाशिम यांनाही जुमानत नसल्याचे या घटनेवरून सिद्ध होत आहे
वृक्ष तोडताना कोणतीही खबरदारी घेत जात घेतली जात नसल्याचे नागरिक बोलत आहे त्याबरोबरच तोडलेल्या वृक्षांची लाकडं तिथेच अनेक दिवस असतात. रात्रीच्यावेळी अथवा दिवसा रस्त्याच्या दोन्ही कडा अरुंद झाल्यामुळे कमालीचे अपघात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
सदर कंपनीच्या वेळ काढू धोरणामुळे अजून किती जणांना जीव गमवावा लागेल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत