वाशिम: शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचे सुधारित निकष तयार केल्याने यापूर्वी नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी अधिकार्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत; मात्र अद्यापही बहुतांश विशेष कार्यकारी अधिकार्यांनी शिक्के परत केले नसल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले.जिल्ह्यात १ हजार ४१४ विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. शासनाच्या अटींची पूर्तता केल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकार्यांची नियुक्ती केली जाते. कागदपत्रे छायांकित करणे यांसह अन्य काही अधिकार या विशेष कार्यकारी अधिकार्यांना दिले जातात. या निवड प्रक्रियेत बदल झाल्याने जिल्ह्यात ११ नोव्हेंबर २0१0 पासून नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकार्यांची सर्व नियुक्त्या रद्द केल्या असून, रबरी शिक्के संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी सात दिवसांपूर्वी दिल्या. या आदेशांची अंमलबजावणी कितपत होत आहे, याबाबत लोकमत चमूने स्टिंग ऑपरेशन केले असता, वाशिम शहरातील बहुतांश झेरॉक्समध्ये सत्यप्रत साक्षांकित करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकार्यांचा शिक्का आणि स्वाक्षरीचा सर्रास वापर केला जात असल्याचे दिसून आले. झेरॉक्स सेंटर एकाचे आणि शिक्के दुसर्याचे असेही प्रकार स्टिंग ऑपरेशनदरम्यान दिसून आले.
बरखास्तीनंतरही सत्यप्रतींवर शिक्के!
By admin | Published: February 17, 2016 2:08 AM