राजेश शेगाेकार, अकाेला : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले अवकाळीचे थैमान पाचव्या दिवशीही पावसाने तडाखा दिला. वादळी पाऊस ,गारपीट नंतर शनिवारी दुपारी चक्क ढगफुटी झाल्याने बार्शीटाकळी तालुक्यातील राजनखेड, शेलगाव, बोरमळी,जनुना शिवारात ढगफुटीसारखा पाऊस पडला. या परिसरातील नदी नाल्यांना पूर आला. पावसाचे थैमान एवढे हाेते की राजनखेड ते बार्शीटाकळी रस्ता बंद झाला आहे.
चिंचाेली, रूद्रायणी, वाघजाळी या परिसरातील शेतात जणू तळे साचले हाेते एवढा पाऊस झाला आहे. पावसासह आलेल्या साेसाटयाच्या वाऱ्याने मोठे वृक्ष कोलमडले आहेत. शनिवारी सकाळपासून पावसाळी वातावरण हाेते. दूपारी २ च्या सुमारास रिमझिम पावसाला सुरवात झाली मात्र साडेतीन वाजता ढगफुटीसारखा पाऊस आल्याने सारेच हवालदिल झाले. दरम्यान शुक्रवारी झालेल्या पावसामुळे जिल्हयातील ७५० हेक्टरवरील फळ पिकांना फटका बसला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"