पिंजर वीज महावितरण कंपनीकडे बिलाचा भरणा केल्यानंतरही महावितरण कंपनीने रोहित्र बसवून वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पिंजर येथील शेतकरी नागेश भगवानराव धाईत यांनी पिंजर येथे ११ जूनपासून उपोषण सुरू केले होते. परंतु उपकार्यकारी अभियंता समीर देशपांडे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्याने उपोषण मागे घेतले.
पिंजर येथील शेतकरी नागेश भगवानराव धाईत यांनी, वीज बिलाचा भरणा केल्यानंतरही कंपनीने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. शेतकऱ्याने कंपनीकडे वारंवार विनंती करूनही वीजपुरवठा सुरू केला नव्हता. परिणामी शेतकऱ्याच्या बागायती शेतीचे नुकसान होत होते. त्यामुळे शेतकऱ्याने वीज कंपनीला आणि पोलीस स्टेशनला निवेदन देऊन ११ जूनपासून उपोषणाला सुरुवात केली होती. उपकार्यकारी अभियंता समीर देशपांडे यांनी पिंजर येथे उपोषणकर्त्यांची भेट घेतली व दोन दिवसात वीजपुरवठा सुरू करतो म्हणून लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शेतकरी नागेश धाईत यांनी उपोषण मागे घेतले.