११ सभासद असणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये एकूण ३६ उमेदवार रिंगणात असून, हे ३६ उमेदवार आपले भाग्य आजमावणार आहेत. या पंचवार्षिक योजनेमध्ये होणारी ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करावी व शांततेत पार पडावी, यासाठी गावातील अनेक जुन्या राजकीय नेत्यांनी दोन महिन्यांपूर्वी विविध सभा घेऊन आपली ग्रामपंचायत अविरोध करण्यासाठी धडपड केली, परंतु नवतरुण उमेदवारांनी नवतरुणांना निवडणुकीत संधी द्यावी, यासाठी आपला अजेंडा तयार केल्यामुळे यावर्षी चारही वॉर्डातील राजकीय बदलल्यामुळे यामध्ये चुरशीची लढत हाेणार आहे.
चारही वॉर्डात विविध पॅनल असून, अनेकांच्या विरोधात वेगवेगळे उमेदवार कार्यरत आहेत. यामध्ये ३६ मतदारांपैकी तीन उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. सर्वाधिक उमेदवार हे वॉर्ड क्रमांक एकमध्ये असल्यामुळे यामध्ये नेमका कोणता उमेदवार विजयी होतो, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
... बॉक्स.....
वॉर्ड क्रमांक एकमध्ये नात्यातील एकमेकांच्या विरोधात
यावर्षी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वाॅर्ड क्रमांक एकमधून सर्वाधिक उमेदवार असून, यामध्ये वडील-मुलगी, सून-काका, काकू-वडील, नात-सून यांच्यामध्ये निवडणुकीची लढत होणार आहे. नात्यातील उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. एकाच कुटुंबातील उमेदवार असल्यामुळे काेणाला मतदान करावे? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.