न्यायालयाने वारंवार निर्देश देऊन आणि भाजपच्या पाठपुराव्यानंतरही ठाकरे सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात चालढकल सुरूच आहे. हा आयोग स्थापन करून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत मागितली असती, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याची वेळ आलीच नसती. राज्य सरकारच्या या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असून ते पुन्हा मिळवून देण्याकरिता राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीने गुरुवार, दि. ३ जून रोजी राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे
............
जगदंबा मिल सिल करा
अकोला : अकोला एमआयडीसी येथील जगदंबा दालमिल सिल करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे यांना निवेदनाद्वारे केली आहे या दालमिल मध्ये ओम राजेश इंगळे वय वर्षे 17 हा अल्पवयीन मुलगा काम करत होता काम करत असताना अंगावर डाळिचा ढीग पडून त्या मुलाचा त्याखाली दबून मृत्यू झाला हाेता
...................................
वाशिम बायपास चौकाचे सौंदर्यीकरण करा
अकोला : वाशिम बायपास चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे यांनी महानगरपालीका उपायुक्त यांना दीलेल्या निवेदनात करण्यात आली अकोला शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वाशिम बायपास चौकाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे करण्यात आले असून या चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे
...............
श्री रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे मदत
अकाेला : येथील श्रीराम नवमी शाेभायात्रा समितीच्या वतिने आ. गाेवर्धन शर्मा तसेच समिती अध्यक्ष विलास अनासने गिरीशजोशी गिरीराज जी यांच्या पुढाकाराने लाडिस फाईल हनुमान चौक येथील रहिवासी सिताबाई तुळशीराम राऊत यांना मदत देण्यास आली या वेळी उपस्थित
राजेश रेड्डी रमेश करिहार कल्लू जी अहिरवार रवींद्र जी जैन राजू भाऊ चौधरी महिला आघाडी महानगर भाजपा उपाध्यक्ष सुषमा जी शुक्ला उत्तर मंडल अध्यक्ष महिला आघाडी शकुंतला जाधव आदी उपस्थित होते