अकोला: असंघटित नोंदणीकृत मजुरांच्या आॅनलाइन नोंदणी व नुतनीकरणाच्या प्रस्तावांना तातडीने स्वीकृती देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी अकोला बिल्डींग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएनच्यावतीने असंघटित मजुरांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने अद्ययावत संगणकीकृत प्रणालीचा अवलंब करण्यात येत असल्याने, असंघटीत मजुरांनी नोंदणी व नुतनीकरणाचे आॅनलाइन प्रस्ताव सादर केले. परंतू गत दहा महिन्यांपासून या प्रस्तावांची पडताळणी व स्वीकृतीचे काम प्रलंबित आहे. त्यामुहे नोंदणीकृत मजुरांच्या आॅनलाइन नोंदणी व नुतनीकरणाच्या प्रस्तावांना तातडीने स्वीकृती देण्यात यावी, नोंदणीकृत मजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर प्रतीमहा पाच हजार रुपये निवृृत्ती वेतन देण्यात यावे, इएमआय आरोग्यदायी योजनेचा लाभ देण्यात यावा, घरकुलासाठी ५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी अकोला बिल्डींग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात बिल्डींग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश सुर्यवंशी यांच्यासह पंचशिल गजघाटे, मदन वासनिक, सुनिल तायडे, सतिष वाघ,भास्कर सोनोने, गजानन राऊत, संतोष सोळंके, सिध्दार्थ पाटील, जावेदखाॅ सुबेदारखाॅ, अहमदअली मर्दानअली, शेख नदीम शेख बबन, बशीरखान, उमेश अवचार, रघुनाथ रायबोले, राजू दामोदर, प्रकाश इंगळे, शेख मिराज शेख रहमान, संदीप नरवणे, उध्दव ढिसाळे, गोपाल पुंडकर, कल्पना सुर्यवंशी, अनुराधा ढिसाळे, सुनिता गजघाटे, कल्पना मेंढे, रेखा गेडाम, शिला तरोणे, कल्पना महल्ले,लता येनकर, सुनंदा ताजने, ज्योती प्रधान, अनिल येलकर, प्रशांत तिरपुडे आदी सहभागी झाले होते.