लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोगस जात वैधता प्रमाणपत्रधारकांना प्रतिबंध करणे, खोटी प्रमाणपत्रे मिळविणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी यासह अन्य मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी २२ जुलै रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गात मोडणाºया व्यक्तींना घ्यावयाचे लाभ किंवा संरक्षण या प्रवर्गात न मोडणाºया व्यक्ती जातीचे बनावट प्रमाणपत्रे सादर करून मिळवित असल्यामुळे खºया मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाºया व्यक्तींवर अन्याय होत आहे. या प्रकारामुळे मागासप्रवर्गात मोडणाºया खºया व्यक्ती लाभ, सुविधांपासून वंचित राहत असल्याचा आरोप यावेळी गोर सेनेच्या पदाधिकाºयांनी केला. खोटे प्रमाणपत्र आढळल्यास दक्षता अधिकारी, जात दाखले देणारे अधिकारी आणि वैधता प्रमाणपत्र देणारे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बनावट कागदपत्र बनविणे, सादर करणे, त्याचा वापर करणे, संघटीतरित्या लाभ घेणे, महसुली पुरावे यामध्ये खोडाखोड करणे, बदल करणे, फेरफार करणे, शालेय व वास्तव्याचे बनावट पुरावे सादर करणे, अफरातफर, संगनमत आदी गुन्ह्याबाबत संबंधितांवर भादंवी कलम ४२०, ४६२, ४६५, ४७१ या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, काही नव्याने रक्तनाते संबंध दाखवून मागासप्रवर्गात घुसखोरी करणाºयांचा शोध घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मागासवगीर्यासांठी असलेली अनुदाने, कर्जे अशा बोगस लाभार्थींनी लाटलेली आहेत. यासाठी सर्व स्तरावर शोध मोहिम राबविण्यात यावी आदी मागण्यांसाठी गोर सेनेने रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात गोर सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोहर राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.