शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

ग्रामसेवकांचे आंदोलन; काम नाही-वेतन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 14:51 IST

काम न केल्याने वेतनही दिले जाणार नाही, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी सांगितले.

अकोला: राज्यात सर्वत्र ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील ३०३ ग्रामसेवक सद्यस्थितीत कोणत्याही कार्यालयात उपस्थित नाहीत. २२ आॅगस्टपासून त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. या दिवसात काम न केल्याने वेतनही दिले जाणार नाही, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी सांगितले. त्याच वेळी जिल्हा परिषदेच्या स्तरावरील ग्रामसेवकांच्या सर्व मागण्यांची पूर्तता केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांवर शासनाकडून कोणत्याही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू झाले आहे. वेतनात असमानता, पदोन्नती संधी नाही. समान काम-समान दाम, समकक्ष पदे-समान वेतनश्रेणी, ग्रामसेवकाच्या शैक्षणिक अर्हता बदल करणे, लोकसंख्या आधारित ग्रामविकास अधिकारी पदांत वाढ करणे, वेतनत्रुटी दूर करणे, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ एक वेतनवाढ देणे, अतिरिक्त कामे कमी करणे, या मागण्यांचा समावेश आहे. त्यासाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. याबाबत ग्रामसेवकांवर कोणती कारवाई केली जाईल, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यातील ३०३ ग्रामसेवकांनी सरपंचाकडे चाव्या दिल्या आहेत. तसेच त्यांचे निवेदन शासनस्तरावर आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणत्याही कारवाईचा मुद्दा शासनाकडून ठरवला जाईल; मात्र दरम्यानच्या काळात कामावर नसल्याने त्यांचे वेतन दिले जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे, असे सांगितले. जिल्हा परिषद स्तरावर पदोन्नती, विभागीय चौकशीची प्रकरणे, निलंबनानंतर पदस्थापना, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, डीसीपीएस, जीपीएफची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले. ३७ कंत्राटी ग्रामसेवक जिल्ह्यात कार्यरत आहेत.

- ग्रामसेवक युनियनला आश्वासनाचा विसरग्रामसेवक युनियनने याआधीही कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी उपस्थिती नसतानाचे वेतन मिळण्याच्या मागणीवर शासनाने त्यांच्याकडून हमीपत्र घेतले होते. त्यामध्ये येत्या काळात असे कामबंद आंदोलन करणार नाही, असे ग्रामसेवक युनियनने शासनाला लिहून दिले होते. त्यामुळे आता आंदोलन काळातील वेतन मिळण्यासाठी पुन्हा कोणती भूमिका युनियनकडून घेतली जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद