अकोटः अनेक वर्षांपासून रखडलेल्या अकोट- अकोला रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे, या मागणीसाठी ७ डिसेंबर रोजी तांदुळवाडी फाट्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा चहा वाटणारा पुतळा घेऊन शासन व प्रशासनाला जागृत करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. दोन वर्षात ४५ किमी रस्ता विकास निधी असतांनाही पुर्ण झाला नाही. लोकप्रतिनिधी लक्ष दिले नाही. या रस्त्याने वाहने चालविताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर धुळीचे लोट उडत असल्याने शेतकऱ्यांची पिके नष्ट होत आहे. अनेक रुग्णवाहिकांना सिरीयस रुग्ण घेऊन जातांना त्रास होतो. नियोजन नसलेल्या हा रस्ता खोदकाम करुन ठेवला आहे. नागरिकांना मनपस्ताप सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत शेतकरी, वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना हा रस्ता तात्काळ सोयीचा करुन देण्यासाठी अकोट तालुका सरपंच संघटना व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अपडाऊन करणारे वाहन चालक, प्रवाशी, परीसरात ग्रामस्थ संघटना व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अकोट ग्रामीण पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
अकोट- अकोला मार्गावर 'ढोल बजाओ' आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 1:56 PM