लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट तालुक्यातील दिनोडा शिवारात शेती प्रयोजनासाठी वडिलोपाजिर्त अतिक्रमित जमिनीवरील अनुसूचित जाती-जमातीच्या आठ कुटुंबांची पिके कापून टाकण्यात आली. त्यामुळे पंचनामा करून संबंधित कुटुंबांना तातडीने पीक नुकसान भरपाई देण्यात यावी; अन्यथा खासदार संजय धोत्रे व पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निवासस्थानासमोर दगडफेक आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा मानवी हक्क सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष जगदीशकुमार इंगळे यांनी गुरुवारी दिला.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिनोडा शिवारात गट नं.२९७/२९८ मध्ये शेती प्रयोजनासाठी वडिलोपाजिर्त अतिक्रमित जमिनीवर पेरणी केल्यानंतर हाताशी आलेले अनुसूचित जाती-जमातीच्या आठ कुटुंबीयांचे पीक काही गावगुंडांनी गत ३१ ऑक्टोबर रोजी जमीनदोस्त करून कापून टाकले. यासंदर्भात जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाकडे निवेदने सादर करण्यात आली; मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पंचनामे करून संबंधित आठ कुटुंबांना तातडीने पीक नुकसान भरपाई देण्यात यावी; अन्यथा या मागणीसाठी मानवी हक्क सुरक्षा दलाच्यावतीने खासदार संजय धोत्रे व पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निवासस्थानासमोर दगडफेक आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा जगदीशकुमार इंगळे यांनी दिला. यावेळी संघटनेचे सुमेध आठवले, संजय वाकळे, धर्मेश थोरात, विजय थोरात, शंकरराव रायबोले, मारोती थोरात, अजय तायडे उपस्थित होते.
खासदार-पालकमंत्र्यांच्या घरासमोर दगडफेक आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:10 AM
अकोट तालुक्यातील दिनोडा शिवारात शेती प्रयोजनासाठी वडिलोपाजिर्त अतिक्रमित जमिनीवरील अनुसूचित जाती-जमातीच्या आठ कुटुंबांची पिके कापून टाकण्यात आली. त्यामुळे पंचनामा करून संबंधित कुटुंबांना तातडीने पीक नुकसान भरपाई देण्यात यावी; अन्यथा खासदार दगडफेक आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा मानवी हक्क सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष जगदीशकुमार इंगळे यांनी गुरुवारी दिला.
ठळक मुद्देपत्रकार परिषद मानवी हक्क सुरक्षा दलाचा इशारा