लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेती विकासाच्या कार्यक्रमासोबतच कृषी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी गुरुवारी केले. कृषी विद्यापीठ प्रशासनातर्फे आयोजित कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना डॉ. भाले बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दिलीप मानकर होते. या प्रसंगी विचार मंचावर सत्कारमूर्ती डॉ. विलास भाले, त्यांच्या सुविद्य पत्नी कीर्ती भाले, माजी कुलगुरू डॉ. गोविंदराव भराड यांच्यासह कृषी अभियांत्रिकीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण डॉ. विलास खर्चे, सहयोगी अधिष्ठाता वनविद्या महाविद्यालय डॉ. ययाती तायडे, सहयोगी अधिष्ठाता उद्यानविद्या महाविद्यालय डॉ. प्रकाश नागरे, विद्यापीठ नियंत्रक विद्या पवार, विद्यापीठ अभियंता आर.पी. खोडकुंभे, बुलडाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. भाले यांनी शिक्षण, विस्तार, संशोधनाशी निगडित विषयावर विवेचन करताना, सामाजिक बांधीलकी हा धर्म असला पाहिजे असे म्हणाले. या कृषी विद्यापीठाने शेती आणि शेतकरी विकास डोळ्य़ासमोर ठेवून आजपर्यंतचे नियोजन केले आहे. त्याचाच परिपाक म्हणून आजवर ५0 हजारांहून अधिक कृषी पदविकाधारक, ३0 हजार कृषी पदवीधर आणि जवळपास नऊ हजार पदव्युत्तर, आचार्य निर्माण केले आहेत. कृषी, शेती विकासास त्यांचा अनुकूल हातभार लागत आहे. या कृषी विद्या पीठाने आजपर्यंत १६0 पीक वाण, १,२0७ शेती विकास, तंत्रज्ञानाच्या शिफारशी देशाला दिल्या आहेत. कृषी विद्या पीठाकडे सर्वांच्याच नजरा असून, येणारा काळ बघता कृषी विद्यापीठांची जबाबदार अधिक वाढली आहे. राज्यपाल, मु ख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी या कृषी विद्यापीठाची धुरा माझ्याकडे सोपविली आहे. आपणा सर्वांना सामूहिकरीत्या या जबाबदारीची जाणीव ठेवून आगामी काळात एकजुटीने काम करू न शाश्वत शेती विकास घडवून आणायचा आहे. कृषी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात रुजवायची आहे, असा मनोदय त्यांनी व्यक्त केले.
कृषी शिक्षण ग्रामीण भागात पोहोचविणार -कुलगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 2:03 AM
अकोला : शेती विकासाच्या कार्यक्रमासोबतच कृषी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी गुरुवारी केले.
ठळक मुद्देकृषी विद्यापीठातर्फे डॉ.भाले यांचा सपत्नीक सत्कार