अकोला : राज्यातील कृषी पदवीधर विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राशी निगडीत उद्योग, व्यवसाय उभारण्याची दिशा देण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या पुढाकाराने पुण्यात १५ व १६ डिसेंबर रोजी 'कृषी उद्योजकता : व्यापारातील जागतिक संधी' या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आणि र्जनल ऑफ अँग्रिकल्चर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या विद्यमाने चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुंरू च्या मार्गदर्शनात पुण्यातील बिबेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात राष्ट्रीय परिसंवाद होऊ घातला आहे. यामध्ये शेती व्यवसाय, कृषी उद्योगांच्या अनुषंगाने झालेल्या कामाचा मागोवा व कृषी उद्योग, तसेच व्यवसायाला नवी दिशा देण्यावर भर दिला जाणार आहे. कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी निविष्ठा उद्योग, कृषी पणन, मूल्यवर्धन तंत्रज्ञान आणि कृषी उद्योजकता आदी बाबींवर तज्ज्ञ चर्चा करतील. कृषी क्षेत्राला व्यवसायाचे स्वरू प प्राप्त करू न देताना त्यामध्ये कृषी पदवीधरांना असलेली संधी आणि वाव, तसेच या व्यवसायासाठी कृषी पदविधरांना आकर्षित करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, या मुद्यावर तज्ज्ञांसह कृषी पदवीधर आपली मते मांडतील. या परिसंवादाचे औचित्य साधून कृषी व्यवसायात असलेल्या राज्यातील कृषी पदवीधर व्यावसायिकांची सूची प्रकाशित करण्यात येणार आहे. कृषी व्यवसायात, तसेच कृषी औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कृषी पदवीधर, संशोधक, कृषी शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित राहणार आहेत.
कृषी पदवीधरांच्या उद्योग, व्यवसायावर भर !
By admin | Published: December 03, 2014 11:33 PM