लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे रोजंदारी मजूर संपावर गेल्याने संशोधनाचे प्लॉट बघण्याची जबाबदारी कृषी शास्त्रज्ञांवर आली आहे. कृषी विद्यापीठ प्रशासनाने सर्वच कृषी शास्त्रज्ञांची पाळी लावली असून, रात्री या शास्त्रज्ञांना कृषी विद्यापीठाचा फेरफटका मारावा लागत आहे.कृषी विद्यापीठाचे १२ ही विभागाचे रोजदांरी कर्मचारी बुधवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. कृषी विद्यापीठाच्या जवळपास संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर पीक, बियाणे संशोधनाचे प्लॉट आहेत. शेतकर्यांना देशी बियाणे उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने बीजोत्पादनावर यावर्षी भर देण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाचे कापसाचे बीजी-२ वाणाची चाचणी घेण्यात येत आहे. फळा-फुलांचे संशोधनाचे प्लॉट आहेत. जवळपास सर्वच पिके, अन्नधान्य, भाजीपाला, तृण, कडधान्याचे संशोधन येथे सुरू आहे. अशा परिस्थितीत रोजंदारी मजुरांनी संप केला आहे. त्यामुळे ही पिके, संशोधन तर प्रभावित होत आहेत. या भागात वन्य प्राण्यांचा मोठय़ा प्रमाणात वावर असल्याने लाख मोलाच्या संशोधनाचे नुकसान होऊ नये, यासाठी शास्त्रज्ञांना रात्रीची गस्त घालावी लागत आहे. दिवसा काम करू न रात्रीची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने शास्त्रज्ञ मात्र त्रस्त झाले आहेत.
कृषी शास्त्रज्ञ रात्रीच्या गस्तीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 2:48 AM
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे रोजंदारी मजूर संपावर गेल्याने संशोधनाचे प्लॉट बघण्याची जबाबदारी कृषी शास्त्रज्ञांवर आली आहे. कृषी विद्यापीठ प्रशासनाने सर्वच कृषी शास्त्रज्ञांची पाळी लावली असून, रात्री या शास्त्रज्ञांना कृषी विद्यापीठाचा फेरफटका मारावा लागत आहे.
ठळक मुद्देकर्मचार्यांच्या संपामुळे आली पिकांच्या रक्षणाची जबाबदारी!