अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा म्हणून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिला.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा म्हणून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २८ मार्च रोजी दिला. कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांच्या दुकानांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी-कामगार एकत्र येऊन काम करणार नाहीत. तसेच दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होणार नाही व दुकानांमध्ये येणाºया ग्राहकांमध्ये नियोजित अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवण्याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांच्या आदेशात देण्यात आले.संजय धोत्रे यांच्या सूचना अन् जिल्हाधिकाºयांचा आदेश!संचारबंदीच्या कालावधीत कृषी आधारित उत्पादने आणि कृषी निविष्ठांची दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या. त्यानंतर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र आणि कृषी निविष्ठांची दुकाने सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील उपाययोजनांच्या कामांचा आढावादेखील केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाºयांकडून घेतला.