राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थिमुळे अनेक संशोधनांचे केंद्र येथून हलवण्यात आले असून, कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयातील ऊस संशोधन केंद्र नागपूरनजीक असलेल्या तारसा येथे, तर कडधान्य संशोधन केंद्र वाशिम बायपास येथे हलविण्यात आले. कृषी विद्यापीठाकडे जवळपास ५ हजार एकराच्यावर शेतजमीन आहे. यात मुख्य बीजोत्पादन क्षेत्र वणीरंभापूर, मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत सर्वाधिक शेतजमीन आहे. या दोन्ही प्रक्षेत्रावर विविध संशोधन कंेद्रे आहेत; पण पाणीच उपलब्ध नसल्याने या संशोधन केंद्रांतर्गत संशोधनाचे काम करणार्या शास्त्रज्ञांपुढे आव्हान आहे. कमी खर्चाचे तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा अर्थात बी-बियाणे संशोधन करू न शेतकर्यांना उपलब्ध करू न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याकरिता शास्त्रज्ञांच्या वेतनावर शासन मोठा खर्च करीत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्र व राज्य शासन संशोधनाकरिता निधी उपलब्ध करू न देते. तथापि, यावर्षी पाऊस नाही आणि पाण्याचा कायमस्वरू पी स्रोत उपलब्ध नसल्याने हिवाळय़ातच रब्बी पिकांच्या पेरणीचा प्रश्न उपस्थित झाला. आताच ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्य़ात शास्त्रज्ञांना हातावर हात धरू न बसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. अकोल्याच्या कृषी विद्यापीठावर मागासलेल्या विदर्भाची मोठी जबाबदारी आहे. या कृषी विद्यापीठाने अनेक वाण विकसित करू न शेतकर्यांना दिलासा दिला आहे; पण अलीकडच्या पाच-सात वर्षात पावसाची अनिश्चितता बघता संशोधन, बीजोत्पादनावर परिणाम होत आहेत. रब्बी हंगामातील पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते; परंतु पाणी नसल्याने बीजोत्पादनावरही परिणाम होत आहे. यावर्षीची परिस्थिती तर खूपच वेगळी आहे. पाणीच नसल्याने रब्बीचे उत्पादन घेणार कसे, यासाठीची कसरत सध्या विद्यापीठात सुरू आहे.
पूर्व विदर्भात साखर कारखाने!पूर्व विदर्भात साखर कारखाने असून, वातावरण अनुकूल असल्याने अकोल्याचे ऊस संशोधन केंद्र तारस्याला हलविण्यात आले. तारस्याला मनुष्यबळाची वानवा असून, तेथील मुख्यालयात राहण्यासाठी कर्मचारी नाहीत. त्यामुळे कृषी विद्यापीठाला प्रथम ही व्यवस्था करावी लागणार आहे. वाशिम बायपास येथे पाण्याची बर्यापैकी मुबलकता असल्याने कडधान्य संशोधन केंद्र तेथे हलवले. या अगोदर नवेगाव बांध येथे ऊस संशोधन केंद्र होते. आजही ते रेकार्डवर आहे.
कृषी विद्यापीठात कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत नाही हे खरे आहे. उन्हाळ्य़ात परिस्थिती गंभीर होईल त्यासाठी विदर्भात जेथे पाणी उपलब्ध आहे तेथे येथील संशोधन केंद्र हलविले जात आहे. पूर्व विदर्भात साखर कारखाने आहेत. तेथे बारमाही पाणी उपलब्ध करावे लागेल.- डॉ. व्ही.एम. भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.