- राजरत्न सिरसाटअकोला - संशोधन, शिक्षण विस्तारासह शेकडो विविध पिकांचे वाण, तंत्रज्ञान देशाला देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला २० आॅक्टोबर रोजी ५० वर्ष पूर्ण होणार असल्याने शिवार फेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठात मोठी तयारी सुरू आहे.२० आॅक्टोबर १९६९ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. ५० वर्षांत कृषी विद्यापीठाने १६९ नवे क्रांतिकारी वाण विकसित केले असून, देशातील विविध भागात शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत. १,३७६ तंत्रज्ञान विकसित करू न शेतकºयांना वापरासाठी शासनाकडे शिफारशी करण्यात आल्या आहेत. तद्वतच २३ प्रकारची विविध कृषी अवजारे विकसित केली आहेत.हजारो कृषी शास्त्रज्ञ या कृषी विद्यापीठाने दिले असून, हरित क्रांती घडविण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. स्थापनेपासूत ते आतापर्यंत ३३,९२१ विद्यार्थ्यांनी विविध कृषी विषयात येथूनपदवी प्राप्त केली आहे.८,८५५ विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ६५५ विद्यार्थी आचार्य पदवी घेऊन कृषी शास्त्रज्ञ बनले आहेत. शेतकरी मेळावे, विविध शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी अधिकाºयांना प्रशिक्षण देण्याचे कामही केलेअसून, कृषी विद्यापीठात ते अविरत सुरू आहे.शेतकºयांसाठी प्रदर्शनकृषी विद्यापीठाने विकसित केलेले बियाणे, तंत्रज्ञान, वॉटर मॉडेल, पीक प्रात्यक्षिक, विविध पद्धती वापरू न करण्यात आलेला शेती विकास, फूल, फळे, कापूस याचे प्रदर्शन विदर्भातील शेतकºयांना बघण्यासाठी खुले करण्यात येत असते.
कृषी विद्यापीठाने दिली १६९ क्रांतिकारी वाण, सुवर्ण महोत्सवाला अकोल्यात मुख्यमंत्री येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 5:04 AM