लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यंदा कृषी विद्यापीठाचे बहुतांश कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आॅनलाइन माध्यमातूनच राबविले जात आहेत; मात्र हे कार्यक्रम प्रगत आणि प्रगतिशील शेतकरी वगळल्यस बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. वाणीचा हल्ला अन् दुबारपेरणीचे संकट शेतकºयांवर ओढवले असताना कृषी संशोधकांनी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन उद््भवलेल्या परिस्थितीवर मार्गदर्शन करण्याची गरज आहे; परंतु कोरोनाच्या भीतीपोटी संशोधक यंदा शेतकºयांपर्यंत पोहोचलेच नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या; पण मध्येच पावसाने दडी मारली अन् दुबार पेरण्यांचे संकट ओढवले. तर दुसरीकडे अंकुरित पिकांवर वाणीनेही हल्ला केला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. दरवर्षी अशा संकटाच्या काळात कृषी विद्यापीठाचे संशोधक थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकºयांना मार्गदर्शन करतात; परंतु यंदा कोरोनाच्या भीतीपोटी संशोधक विद्यापीठाच्या बाहेर जाण्यास टाळत असल्याचे वास्तव आहे. शिवाय बहुतांश मार्गदर्शन कार्यक्रम आॅनलाइन माध्यमातूनच शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र, बहुतांश पारंपरिक शेतकºयांना अद्यपाही कृषी संशोधकांकडून मार्गदर्शन मिळाले नाही. अशा परिस्थितीत करायचे तरी काय, असा प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे.पारंपरिक शेतकºयांकडे दुर्लक्ष कृषी विद्यापीठाकडून राबविण्यात येणारे आॅनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम केवळ प्रगत शेतकºयांपर्यंत पोहोचत आहे. हे प्रमाण केवळ १० ते १५ टक्क्यांपर्यंत आहे; परंतु उर्वरित पारंपरिक शेतकºयांपर्यंत अजूनही योग्य प्रमाणात तंत्रज्ञान पोहोचले नाही, तर काही भागात नेट कनेक्टिव्हिटीचीही समस्या आहे.
मी स्वत: कृषी विद्यापीठाच्या आॅनलाइन कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. मार्गदर्शन तर मिळाले; परंतु ते सर्वच शेतकºयांपर्यंत पोहोचू शकले नाही, हे देखील तेवढेच खरे आहे.- विलास ताथोड, शेतकरीआॅनलाइन माध्यमातून कृषी विद्यापीठ बहुतांश शेतकºयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. कनेक्टिव्हिटीच्या काही समस्या आहेत; मात्र शेतकºयांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी कृषी विद्यापीठ निरंतर कार्यरत आहे.- डॉ. डी.एम. मानकर,शिक्षण विस्तार संचालक, डॉ. पंदेकृवि, अकोला