लोकमत न्यूज नेटवर्कअकोेला : जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊसच झाला नसल्याने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पाणलोट क्षेत्र कोेरडे आहे. कृषी विद्यापीठाने केलेले जलसंचयाचे प्रयोगांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.यावर्षी पावसाने मोठी दडी मारल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पाणलोट क्षेत्रात पाणी साचलेच नाही. येथे जलसंचायाचे मॉडेल तयार करण्यात आलेले आहे. पावसाळ््यात या मॉडेलनुसार पडणाऱ्या पाण्याचा ताळेबंद ठेवला जातो. परंतु, यावर्षी दमदार पाऊसच झाला नाही. तसेच कृषी विद्यापीठाने जलपुनर्भरणाचे अनेक प्रयोग केलेले आहेत. सिमेंट नाला बांंध, नाला खोलीकरण आदी कामे झालेली आहेत. विहिरींचा गाळ काढलेला आहे. हे मॉडेल शिवारफेरीत शेतकरी बघत असतात. पाऊस नसल्याने कृषी विद्यापीठाचे महत्त्वाचे संशोधन सूक्ष्म सिंचनावर जगविण्यात येत आहे. कापूस संशोधन प्रक्षेत्रावर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाचा शिरवा येत असल्याने या पिकांना दिलासा मिळाला आहे. पण, एवढ्यावर चालणार नसल्याने कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कृषी विद्यापीठातील सोयाबिनचे पीक अजून बुडातच आहे. दरम्यान, कृषी विद्यापीठाने केलेल्या पाण्याच्या प्रयोगाचा फायदा दरवर्षी संरक्षित सिंचनासाठी करण्यात येतो. कोरडवाहू संशोधन केंद्रावरील तळ््यातील पाणी बारा महिने वापरण्यात येत असते. या पाण्यावरच येथे भाजीपाला व इतर संशोधनाचे प्रयोग केले जातात, हे विशेष.
कृषी विद्यापीठाचे पाणलोट क्षेत्र कोरडेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:23 AM