अकोला : शेतकरी, कारखानदारांना कृषी अवजारांचे परीक्षण करण्यासाठीचे केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातून आतापर्यंत चार राज्यांतील १३९ नवीन कृषी अवजारांचे चाचणी (परीक्षण) घेऊन मान्यता दिली आहे. या कें द्रामुळे विदर्भातील शेतकरी, कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. शेतकºयांनी या व्यवसायाक डे वळावे, यासाठीचे येथे प्रशिक्षण दिले जात आहे.कृषी अवजारांची निर्मिती केल्यानंतर परीक्षण महत्त्वाचे असते. विदर्भात हे केंद्र नसल्याने येथील शेतकरी, कारखानदारांना कृषी अवजारांच्या परीक्षणासाठी इतर राज्यांत जावे लागत होते. ही बाब खर्चिक आणि वेळ लागणारी असल्याने शेतकरी कृषी अवजारे निर्मिती करण्यात धजावत नव्हते. आता कृषी विद्यापीठांकडूनच कृषी अवजारे, यंत्राची गुणवत्ता चाचणी प्रमाणपत्र उपलब्ध केले जात असल्याने येथील कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, शेतकºयांमधून उद्योजक उभे करण्यासाठी शेतकºयांना कृषी यंत्र, अवजारे विकसित करणे व चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.यापूर्वी देशात केवळ चार केंद्रं होती. आता या केंद्रांची संख्या २३ करण्यात आली असून, महाराष्टÑातील चारही कृषी विद्यापीठांत चार गुणवत्ता तपासणी केंद्र देण्यात आले आहे. कारखानदार, उद्योजक, शेतकºयांनी विकसित केलेल्या कृषी यंत्रांची तपासणी करू न परप्रांतातून गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविण्यास जो विलंब होत होता, तो कमी झाला.या केंद्राच्या उभारणीनंतर मागील तीन वर्षांत महाराष्टÑ, आंध्र प्रदेश, पंजाब व कर्नाटक आदी राज्यांतील १३९ कृषी अवजारांची चाचणी घेऊन ही यंत्रे काम करण्यासाठी योग्य असल्याचे प्रमापत्र देण्यात आले आहे. यावरच शासनाचे अनुदान अवलंबून आहे.
आतापर्यंत १३९ नवीन कृषी अवजारांची चाचणी घेऊन परीक्षण अहवाल देण्यात आला आहे. यावर्षी २८ नवीन अवजारे चाचणीसाठी आली आहेत.डॉ. अनिल कांबळे,प्रमुख, कृषी अवजारे परीक्षण व प्रशिक्षण केंद्र,डॉ. पंदेकृवि, अकोला.