शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

जवस पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतीशाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 6:47 PM

संपूर्ण विदर्भात शेतावरच शेतीशाळा घेण्यात येत आहेत.

अकोला : औषधी गुणधर्मासह ओेमेगा-३ चे प्रमाण सर्वाधिक असलेल्या जवस पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी लक्ष केंद्रित केले असून, शेतकऱ्यांना याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी संपूर्ण विदर्भात शेतावरच शेतीशाळा घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा यामागील उद्देश आहे.राज्यात जवसाचे क्षेत्र १४ हेक्टरवर असून, यातील विदर्भात ६,५०० हेक्टर आहे. या तेलवर्गीय पिकात ५७ ते ५८ टक्के ओमेगा-३ आहे. हे सर्वाधिक पोषक असून, गुुडघे, हृदयविकार, मधुमेह आदी रोगांवर तर खूपच गुणकारी आहे. जवसाचे दररोज ३० ग्रॅम सेवन केल्यास हे रोग नाहीसे होतात. एकूणच आरोग्यासाठी जवस लाभदायक आहे. एवढेच नाही तर तेल काढल्यांनतर जी ढेप तयार मिळते ती जनावरांना आणि कोंबड्यांना खाऊ घातल्यास जनावरांच्या दुधात, कोंबड्यांच्या अंड्यांत आणि चिकनमध्येही ओमेगा-३ चे प्रमाण आढळून आले आहे. आपल्याकडे मोजक्या ठिकाणी सुपर मार्केटमध्ये हे उपलब्ध आहे. याचा परदेशातही अभ्यास झाला आहे. विशेष म्हणजे यात फायबर असल्याने जवस काढल्यानंतर उरलेल्या धसकट, कुटारातदेखील हा पदार्थ उपलब्ध होतो. यापासून चांंगला धागा तयार होत असल्याने सध्या देशातील नामवंत कंपन्या हे परदेशातून मागवत आहे. याचा वापर बॅ्रन्डेड लिनन कापड व नोटा तयार करण्यासाठी केला जातो. एका एकरात असे कुटार, धसकट जवळपास २ ते ३ क्विंटल प्राप्त होत असते. तसेच जवसाचे एकरी उत्पादन हे चार ते पाच क्विंटल आहे. हे पीक कृषी मूल्य आयोगाच्या यादीत नसल्याने आधारभूत किंमत नाही. त्यामुळे बाजारात जवसाचे दर प्रतिक्विंटल ३,५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत असतात. हे दर वाढल्यास आणि प्रसार, प्रचार करू न शेतकºयांना मार्गदर्शन केल्यास या पिकाचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रत्यक्ष शेतावर शेतीशाळा घेण्यावर भर दिला असून, याची सुरुवात अकोला आणि वर्धा जिल्ह्यातून करण्यात आली आहे. शेतकºयांनी हे पीक घ्यावे.

 जवसात ओमेगा-३ सर्वाधिक असून, मानवी आरोग्यासाठी सर्वात उपयोगी आहे. या पिकाचा काडीकचरा, धसकटापासून उच्च दर्जाचे कापड, धागा तयार होतो तसेच नोटा बनविण्यासाठीही वापर केला जातो. तेलाचे भाव चांगले आहेत.- डॉ. बिना नायर,प्रामुख,अ.भा. समन्वयित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प, डॉ. पंदेकृवि, नागपूर.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती