लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबविल्या जाणाºया विशेष घटक योजनेतून लाभार्थींना स्वयंचलित तिफन वाटपासाठी जून, जुलैमध्ये देयक अदा केली जात आहेत. हा प्रकार नियमबाह्य असून, पुरवठादारांची देयक अदा करू नये, असे निर्देश अर्थ सभापती पुंडलिकराव अरबट यांनी समितीच्या सभेत दिले. यावेळी सातही पंचायत समितीच्या सहायक लेखाधिकाºयांना बोलावण्यात आले होते.सभेला सदस्या रेणुका दातकर, ज्योत्स्ना बहाळे, बार्शीटाकळीचे सभापती भीमराव पावले, मूर्तिजापूरच्या भावना सदार उपस्थित होत्या. यावेळी अकोट पंचायत समितीमध्ये विशेष घटक योजना लाभार्थींना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात स्वयंचलित तिफन यंत्रांचे वाटप केले जात आहे. ही बाब सभापती अरबट यांच्या भेटीत उघड झाली. त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. त्यामध्ये २०१५-१६ मधील योजनेतून बैलगाडी, बैलजोडी खरेदीनंतर शिल्लक रकमेतून लाभार्थींना स्वयंचलित तिफन पुरवठ्यासाठी महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाला आदेश देण्यात आले. ही योजना ३१ मार्च २०१६ मध्येच पूर्ण होणे आवश्यक असताना जुलै २०१७ उजाडला, तरीही साहित्य वाटप करणे, प्रचंड उशिराने पुरवठा करणाºयांना त्याची देयकेही आधीच अदा करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे लाभार्थींना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.तो तत्काळ बंद करावा, उशिराने पुरवठा करणाºया संस्थेची देयके थांबवावी, असे निर्देश सभापतींनी दिले.सातही पंचायत समितीच्या सहायक लेखा अधिकाºयांना बैठकीला उपस्थित राहण्याचे बजावण्यात आले होते. त्यानुसार आता सर्वच पंचायत समितीमध्ये देयके थांबविली जाणार आहेत.
विघयोतील तिफनची देयके थांबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 2:17 AM
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबविल्या जाणाºया विशेष घटक योजनेतून लाभार्थींना स्वयंचलित तिफन वाटपासाठी जून, जुलैमध्ये देयक अदा केली जात आहेत. हा प्रकार नियमबाह्य असून, पुरवठादारांची देयक अदा करू नये, असे निर्देश अर्थ सभापती पुंडलिकराव अरबट यांनी समितीच्या सभेत दिले. यावेळी सातही पंचायत समितीच्या सहायक लेखाधिकाºयांना बोलावण्यात ...
ठळक मुद्देअर्थ समितीच्या सभेत सभापती अरबट यांचे निर्देश