शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
2
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
4
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
5
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
6
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
7
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
8
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
9
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
10
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
11
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
12
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
13
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
14
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
15
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
16
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
17
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
18
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
19
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
20
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान

आदिवासी शेतक-यांचे कृषिप्रक्रिया उद्योग सुरू

By admin | Published: February 02, 2015 1:43 AM

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्वतंत्र प्रशिक्षण वर्ग; जीवनसत्त्वयुक्त अन्नधान्य निर्माण करण्यावर भर.

अकोला : विदर्भातील आदिवासी शेतकर्‍यांमधून उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी त्यांना आधुनिक कृषी प्रक्रिया तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येत आहेत. याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्व तंत्र प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. ३१ जानेवारी रोजी धारणी (जि. अमरावती) तालुक्यातील अतिदुर्गम कुसुमकोट येथे शेतकर्‍यांना जीवनसत्त्वयुक्त अन्नधान्य निर्माण करण्यासह विविध कृषिप्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात आले. खेड्यातला शेतमालावर खेड्यातच प्रक्रिया व्हावी, याकरिता या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत महिला शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील कंझरा आणि अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी या दोन ठिकाणी सर्वसामान्य शेतकर्‍यांचे प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएसआर) अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित प्रकल्प कापणीपश्‍चात तंत्रज्ञान विभागाच्या उ पयोजनेतून शेतमाल प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आदिवासी शेतकर्‍यांना आधुनिक कृषिप्रक्रिया तंत्रज्ञान प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये उद्यमशीलता, उद्योजक निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. दर्‍याखोर्‍यांमध्ये राहणार्‍या या शे तकर्‍यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयसीएसआरने कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केलेत. यासाठी आयसीएसआरने अखिल भारतीय समन्वयित प्रकल्प कापणीपश्‍चात तंत्रज्ञान विभागाला तीन लाखांचा निधी उपलब्ध केला आहे. .विदर्भातील आदिवासी भागातील या शेतकर्‍यांना फळ प्रतवारी,कचराज्वलित शुष्क मिरची,कांदा निष्कासन यंत्र, डाळ गिरणी,जनावरांचे खाद्य तयार करणे आदी कृषिप्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या कृषी विद्यापीठाच्या कापणीपश्‍चात तंत्रज्ञान विभागाने आदिवासी भागाव्यतिरिक्त सर्वसामान्य शेतकर्‍यांना कृषिप्रक्रिया उद्योग प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले असून, अंजनगावसुर्जी ये थील नवृत्ती बारब्दे आणि मूर्तिजापूर तालुक्यातील सरिता शामसुंदर यांनी महिला बचतगटांच्या माध्यमा तून शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला आहेत. शेतीसह या शेतीपूरक उद्योगांमुळे त्यांच्या वार्षिक उत्पन्नात भर पडली आहे.