लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पिकांवरील विविध कीड, रोगांचे आक्रमण व त्यावर वापरण्यात येणारे विविध कीटकनाशकांचा वापर बघता, शेतकर्यांना विषयुक्त धान्य,भाजीपाल्याचीच खरेदी करावी लागत आहे. यातून शेतकर्यांनी बाहेर पडण्यासाठी या कृषी प्रदर्शनातून विषमुक्त सेंद्रिय शेती व यांत्रिकीकरणाचा संदेश देण्यात आला आहे. चार डोममधील ३१0 दालनात इतर संशोधनासोबतच सेंद्रिय शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकर्यांचा कल दिसून आला.या प्रदर्शनामध्ये एकूण ४ मोठे डोम उभारण्यात आले असून, पहिल्या डोममध्ये कृषी विद्यापीठांतर्गत विविध विभागांची दालने थाटण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शास्त्रोक्त कापूस लागवड तंत्रज्ञान प्रामुख्याने प्रदर्शित करण्यात येणार आहे. विषमुक्त शेतीला अधिक प्रोत्साहन देत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुरस्कारसुद्धा यंदाचे एक वैशिष्ट्य आहे. कौशल्यावर आधारित शेती हे यंदाच्या प्रदर्शनाचे ब्रिद राहणार असून, यामध्ये केवळ पीक वाण, तांत्रिक शिफारशीपुरते र्मयादित न राहता शेतीपूरक व्यवसाय ज्यामध्ये पशुपालन, जातिवंत गायी, म्हशी, कोंबड्या, बकरी, वराह पालनासह चारा उत्पादन, कमी प्रतीच्या चार्याची मूल्यवृद्धी, दुग्धपदार्थ निर्मिती व विक्री यांचा समावेश आहे. फळ प्रक्रिया उद्योगात जाम, जेली, स्क्वॉश, सिरप, लोणचे आदींसह जांभूळ, केळी, संत्रे, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, पपई, पेरू, आवळा आदी फळ पिकांचे मूल्यवृद्धी साधण्याचे तंत्र उपलब्ध आहे. सोबतच अतिशय अभिनव शेती अवजारे, यंत्रे, सूक्ष्म सिंचन पद्धती, ट्रॅक्टर, कापणी पश्चात मूल्यवर्धन करणारे संयंत्र ज्यामध्ये पीडीकेवी मिनी दाल मिल, सीताफळ गर काढणी यंत्र, मिरची बीज निष्कासन यंत्र, तुती फ्रुटी संयंत्र व अनेक यंत्रे पाहण्यास उपलब्ध आहेत. जातिवंत जनावरांचे प्रदर्शन, ग्राम बीजोत्पादन, सेंद्रिय शेती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञान, फळबाग, फूल शेती, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, शेती पूरक व्यवसायांचे विविध व उपलब्ध संसाधनांवर आधारित फायदेशीर तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन पद्धती, पाणलोट व्यवस्थापन, औषध व सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान, रोप वाटिका, फळे व दुग्ध प्रक्रिया उद्योगाचे नानाविध प्रयोग येथे उपलब्ध आहे.
अॅग्रोटेक २0१७ : विषमुक्त शेतीला प्रोत्साहन; ३१0 दालनात विविध माहिती उपलब्ध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:00 AM
अकोला: पिकांवरील विविध कीड, रोगांचे आक्रमण व त्यावर वापरण्यात येणारे विविध कीटकनाशकांचा वापर बघता, शेतकर्यांना विषयुक्त धान्य,भाजीपाल्याचीच खरेदी करावी लागत आहे. यातून शेतकर्यांनी बाहेर पडण्यासाठी या कृषी प्रदर्शनातून विषमुक्त सेंद्रिय शेती व यांत्रिकीकरणाचा संदेश देण्यात आला आहे. चार डोममधील ३१0 दालनात इतर संशोधनासोबतच सेंद्रिय शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकर्यांचा कल दिसून आला.
ठळक मुद्देकृषी प्रदर्शनात शेतकर्यांची रेलचेल