मयूर गोलेच्छा / लोणार : लोणार येथील धारातीर्थावर प्राचीनकाळी पवित्र स्नानासाठी पंचक्रोशीतील राजे महाराजे आणि भाविकांची मोठी गर्दी असायची. धारेवरील पवित्र स्नानास येणार्या भाविकांसाठी जेवणाची सुविधा होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी १८ व्या शतकात येथे अन्नछत्रांची बांधणी करुन अन्नदानाची कायमस्वरुपी व्यवस्था केली. मात्र अन्नछत्रांची अत्यंत दुरावस्था झाली असून, याकडे पुरातन विभागाचे दुर्लक्ष असल्याने दिसून येते १८ व्या शतकात २८ वर्षे रयतेच्या सुखासाठी राज्यकारभारच केला नाही तर पंचमहाभूताचे संरक्षण करण्याचे अलौकीक अजरामर असे कार्य करुन पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावे, असे अन्नदानाचे कार्य भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलीझाबेथ मार्गारेट म्हणून संबोधल्या गेलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी देशभरात अनेक हिंदू मंदिरे, नदीघाटासह धार्मिक तीर्थक्षेत्राला जाणार्या भाविकांची जेवणाची सुविधा होण्यासाठी तिर्थक्षेत्रासाठी अन्नछत्रांची बांधणी करुन अन्नदानाची कायमस्वरुपी व्यवस्था केली. इतर तिर्थक्षेत्राप्रमाणे लोणार येथेही अहिल्यादेवींनी १८ व्या शतकात अन्नछत्राची बांधणी केली. लोणार येथील धारातीर्थावर प्राचीनकाळी पवित्र स्नानासाठी पंचक्रोशीतील राजे महाराजे आणि भाविकांची मोठी गर्दी असायची. धारेवरील पवित्र स्नानास महत्व असायचे त्यामुळे मोठी गर्दी धारेवर जमायची हेच हेरुन होळकर संस्थाद्वारे लोणार येथील धारेच्या काठावर भव्य अशा अन्नछत्राची उभारणी केली. अन्नछत्रातून धारेवर स्नानासाठी येणार्या भाविकांसह गोरगरीबांच्या जेवणाची सुविधा झाली होती. अन्नदानाचे महत्व जाणून बांधलेल्या अन्नछत्राची पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झाली असून, मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली आहे. १८ व्या शतकात संपूर्ण दगडांमध्ये बांधण्यात आलेल्या या अन्नछत्राच्या चारही बाजूने मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण झाले. अन्नदानाचे प्रतिक असलेले अन्नछत्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच अतिक्रमणामुळे अन्नछत्र पाहण्यापासून पर्यटक वंचित राहत आहेत. सन २0१0-११ मध्ये दुरुस्तीच्या नावाखाली तत्कालीन अधिकारी पवार यांनी लाखो रुपयांची बिले काढली. मात्र आजही परिस्थिती आहे तशीच आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेल्या कार्याची दखल समाजानेही घेतली नसून ऐरव्ही महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या सार्जया करुन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणार्यांना अहिल्यादेवी होळकरांचा आणि त्यांनी केलेल्या कार्याचा विसर पडत आहे. हेच त्यांनी बांधलेल्या अन्नछत्राच्या दुरावस्थेवरुन दिसून येते.
अहल्यादेवी अन्नछत्राची दुरवस्था
By admin | Published: June 06, 2015 12:38 AM